Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले

- रणवीर रजपूत

Webdunia
NDND
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय. स्त्री‍शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई यांची आज 177 वी जयंती त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दसुमने....

  अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली.      
दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिल ी, तर ती फुले दांम्पत्याने. बालविवाहाला विरोध करुन ते थांबले नाही त, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडलं. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दांम्पत्यांना यश येऊन त्यास 1856 मध्ये मान्यता मिळाली.

शिक्षिक ा, लेखिक ा, कवियित्र ी, मात ा, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरी ब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनाव ं, म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाह ी, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं.

अज्ञा न, जातीभे द, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. ज्योतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. ज्योतीरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या.

फुले दांम्पत्यांनी त्यानंतर नेटिव्ह फिमेल स्कू ल, दि सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन या संस्‍था स्थापन केल्या. पाहाता-पाहाता फुलेंनी पुणे शहर व परिसरात 20 शैक्षणिक संस्थांचं जाळं पसरवलं. इतकेच नव्हे त र, शाळेतील मुलांची गळती थांबविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ' प्रोत्साहन भत्त ा' तसेच 'आवडेल ते शिक्ष ण' देण्यावर भर दिला. 19व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली.

अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे फुले दांम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा 10 पटीने वाढली. इतकेच नव्हे त र, फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी फुले दांम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रा‍तील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली.

शैक्षणिक क्षेत्रातल्या मौलिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दांम्पत्याचा समारंभपूर्वक सत्कार केला. याप्रसंगी मेजर कँडी यांनी इंग्रज सरकारचे निवेदन वाचून दाखवून या दाम्पत्याचा देऊन गौरव केला. ज्योतीरावांच्या समत ा, सत्यपरायणत ा, मानवतावाद या तत्त्वांचा अंगिकार करुन त्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं सारं जीवन व्यतित केलं.


शिक्षणाची महती गातांना सावित्रीबाई म्हणता त,
'' शिक्षणाने मनुष्यत्व येत े, पशुत्व हरते पहा! विद्या हे धन आहे र े, श्रेष्ठ सार्‍या धनाहू न, तिचा साठा जयापाश ी, तो ज्ञानी मानिती जन!!''
मुलींना शिकव ा, भेदाभेद हटव ा, असं नुसतं सांगून जमायचं नाही !
शिक्षण देऊन शहाणं करायच ं, दुसरा काही उपायच नाही!!

'' जिच्या हाती पाळण्याची दोर ी, ती जगाते उद्धार ी'' या उक्तीस प्रत्यक्ष कृतीत उतरवून फुले दांम्पत्यांनी मुलींच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. 1889 साली जोतीरावांच्या मृत्युनंतर त्यांच्या ‍स्त्रीशिक्ष ण, स्त्रीमुक्त ी, स्त्री-पुरुष समानता या कार्यांना सावित्रीबाईंनी पुढे गती दिली. सावित्रीबाईंनी जोतीरावांना दिलेली साथ अजोड होती. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्या सावलीसारख्या त्यांच्या बरोबर असत. सेवा व करुणेचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला.

  बालवयात विवाह झाल्यावर पतीचा एकाएकी मृत्यु झाल्यास, अशा विधवा मुलींचे त्याकाळी केशवपन करण्यात येत असे. या अघोरी प्रथेचा तीव्र निषेध करुन त्याच्या विरोधात प्रखर लढा दिला.      
हुंड्याशिवाय कमी खर्चात गोरगरी ब, दुर्बल घटकांच्या मुलींचा विवाह व्हाव ा, यासाठी फुले दांम्पत्यांनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरु केली. त्यामुळे असंख्य पददलितांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्न सहजपणे सुटला. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हाव े, यासाठी स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद खुला करुन जातीभेद निर्मुलनाच्या अभियानास अधिक चालना दिली.

बालवयात विवाह झाल्यावर पतीचा एकाएकी मृत्यु झाल्या स, अशा विधवा मुलींचे त्याकाळी केशवपन करण्यात येत असे. या अघोरी प्रथेचा तीव्र निषेध करुन त्याच्या विरोधात प्रखर लढा दिला. या कुप्रथेच्या विरोधात फुले दांम्पत्यांनी नाभिक बांधवांचा संपही घडवून आणला. बालविवाहांना त्यांनी कडाडून विरोध केल ा, तर विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे त र, फुले दांम्पत्यांनी एका तरुण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला शिकवून-सवरुन डॉक्टर केले आणि या त्याच डॉ. यशवंतरावांनी 1897 साली महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरली असतांना आईवडिलांचा आदर्श समोर ठेवून सेवाभावीवृत्तीने मोलाची वैद्यकीय सेवा दिली व असंख्य गोरगरिबांचे प्राण वाचविले.

याशिवाय सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृहातील मुलांची वात्सल्यपूर्ण सेवा केली. 1877 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असत ा, फुले दांम्पत्यांनी गावोगाव फिरुन निधी जमवला आणि धनकवाडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम सुरु करुन सुमारे एक हजार गोरगरीब मुलांची तेथे भोजनव्यवस्था केली. सुप्रसिद्ध लेखिका इंदुमती केतकर म्हणता त, '' अज्ञात आईबापाची निराधार मुलांना पोटच्या मुलासारखं घेऊन त्यांना मोठं करणार्‍या उदार स्त्री या आपणास अनेक वेळा पहावयास मिळता त, परंतु एखाद्या विधवेला अनैतिक संबंधातून झालेलं मूल आपलेच समजून समाजाच्या विरोधाला न जुमानता त्याचं संगोपन करणारी एकच स्त्री ती म्हणजे सावित्रीबाई!

अद्यापही सावित्रीबाई फुले यांचे कार्य पूर्ण झालं नसल ं, तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच महाराष्ट्र शासाने मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. मुलींनी शिक्षण घेऊन स्वतच ा, कुटुंबाचा व समाजाचा विकास साधाव ा, म्हणजे हीच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल.

( लेखक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक आहेत.)
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

गरोदरपणात जंक फूड खाणे धोकादायक असू शकते, जाणून घ्या

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट

डबल चिनचा त्रास आहे, हे व्यायाम करून टोन्ड चेहरा मिळवा

पोटदुखीला हलके घेऊ नका, या 5 गंभीर समस्या होऊ शकतात

नात्यात या गोष्टींची विशेष काळजी घ्या

Show comments