Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा

/announcement-godavari-gaurav-award-kusumagraj-foundation
Webdunia
शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:00 IST)
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दर एक वर्षाआड देण्यात येणा-या ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केली आहे. यावर्षी, गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि नुकत्याच झालेल्या कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. 
 
येत्या १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. १९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणा-या मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

Mango Ice Cream घरी बनवा बाजारासारखे मँगो आईस्क्रीम

Congratulations message for promotion in Marathi यशाबद्दल अभिनंदन शुभेच्छा

झटपट अशी बनणारी मऊ बेसन इडली रेसिपी

उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

Labour Day Speech 2025 कामगार दिनानिमित्त भाषण

पुढील लेख
Show comments