Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ.मुं.शिंदे

वेबदुनिया
PR
सासवड येथे होणार्‍या 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फ.मुं.शिंदे (फकीरा मुंजाजी शिंदे) यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत एकूण 904 मतांपैकी फ मुं शिंदेंना 460 मते मिळाली. साहित्यिका प्रभा गणोरकर यांना 331 मते मिळाली. अन्य दोन उमेदवार अरूण गोडबोले आणि संजय सोनावणी यांना अनुक्रमे 60 आणि 39 मतांवर समाधान मानावे लागले.

शिंदेंच्या रुपात डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यानंतर मराठवाड्याला पुन्हा एकदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. दरवर्षी अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद रंगतात. मात्र यंदा वाद न रंगल्यामुळे निवडणुकीचा फारसा धुरळा रंगलाच नाही.

WD
औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यपक होते, 2002 मध्ये ते निवृत्त झाले आहेत. 'आई एक गाव असतं' ही त्यांची लोकप्रिय कविता आहे. शिंदेच्या नावावर 27 कविता संग्रह आणि इतरही विपूल लेखण सामुग्री त्यांनी केले आहे. त्यांच्या राजकीय वात्रटीका प्रसिद्ध आहेत.

' अध्यक्षपदीचा मिळालेला सन्मान हा मी माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो, असे फ.मुं.नी निवडीनंतर सांगितले. 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते, त्यामुळे मी माझे हे यश पत्नीला समर्पित करतो.' असेही शेवटी फ.मुं.नी सां‍गितले.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

सर्व पहा

नवीन

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments