Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरण्मूल येथील पार्थसारथी मंदिर

- टी. प्रतापचंद्रन

Webdunia
केरळमधील प्राचीन मंदिरांपैकी अरण्मूल श्री पार्थसारथी मंदिर आहे. श्रीकृष्ण येथे पार्थसारथी रूपात वसले आहेत. पथानमथिट्टा जिल्ह्यात पंबा नदीच्या किनारी हे मंदिर आहे. निशस्त्र कर्णाला मारल्याचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाने हे मंदिर बांधल्याचे मानले जाते.

हे मंदिर मुळात शबरीमाला जवळील नीलकल येथे तयार करण्यात आले. त्यानंतर सहा बांबूंच्या तराफाच्या सहाय्याने ते येथे आणण्यात आले. म्हणूनच या भागाचे नाव अरण्मूल पडले. मल्याळममध्ये याचा अर्थ बांबूचे सहा तुकडे असा होतो.

दरवर्षी भगवान अय्यपा यांचे सुवर्ण अंकी (पवित्र दागिने) येथून शोभायात्रा काढून मिरवत शबरीमलापर्यंत नेले जातात. ओणम या केरळमधील प्रसिद्ध उत्सवादरम्यान अरण्मूल येथे नौकांची शर्यतही आयोजित केली जाते.

WD
हे मंदिर केरळी वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. पार्थसारथीची मूर्ती सहा फूट उंच आहे. दरवाजांवर अठराव्या शतकातील सुंदर चित्रे आहेत. चार स्तंभावर हे मंदिर उभारले आहे. पूर्वेला असलेल्या स्तंभाजवळून मंदिरात जायला १८ पायर्‍या आहेत. तर मंदिरातून उत्तरेला असलेल्या पंबा नदीवर जाण्यासाठी ५७ पायर्‍या उतराव्या लागतता.

मल्याळम दिनदर्शिकेप्रमाणे मीनम या महिन्यात येथे दहा दिवसांचा मोठा उत्सव असतो. ओणम उत्सव काळात येथे भरणार्‍या नौका शर्यती प्रसिद्ध आहेत. या शर्यतींना अरूण्मला वल्लमकाली असे म्हणतात. वास्तविक या शर्यतीमागेही मोठी परंपरा आहे. या नौकेत तांदूळ व अन्य खाद्यपदार्थ घेऊन ते जवळच्या गावात वाटायची 'मंगद' नावाची ही परंपरा शर्यतीत परिवर्तित झाली आहे. कोडियट्टमने (ध्वजारोहण) प्रारंभ आणि मूर्तीला स्नान घालून या उत्सवाची सागंता होते.

WD
गरूडवाहन इजुनल्लातू हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. यात शोभायात्रा काढली जाते. भगवान पार्थसारथी यांना गरूडाच्या रथावर बसवून पंबा नदीवर नेले जाते. यावेळी मंदिराला मोठा नजराणा भेट दिला जातो. याशिवाय खांडवनादाहनम नावाचा एक उत्सव धनुस या मल्याळम महिन्यात साजरा केला जातो. यात मंदिराच्या समोर झाडांची पाने, फांद्या यांच्या सहाय्याने जंगल साकारले जाते. मग महाभारतातील खांडववन दहनाचा देखावा साकार केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीही येथे जोरदार साजरी होते.

कसे जाल?

रस्ता मार् ग- पथानमथिट्टा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अरण्मूल सोळा किलोमीटरवर आहे. त्यासाठी बस उपलब्ध आहेत.

रेल्वे मार् ग- चेनगन्नूर हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून १४ किलोमीटरवर अरण्मूल आहे.

हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ कोची आहे. अरण्मूलपासून ते ११० किलोमीटरवर आहे.

वटपौर्णिमा आरती

वटपौर्णिमा कथा मराठी

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा Vat Purnima 2024 Wishes In Marathi

वटपौर्णिमा संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi

25 जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, शुभ मुहूर्त- पूजा विधी आणि अंगारकी चतुर्थी श्लोक

IND vs BAN: T20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

Show comments