Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कलियुगातील परमेश्वराचे निवासस्थान

वैशिष्ट्यपूर्ण शबरीमाला मंदिर

शशिमोहन
WDWD
शबरीमाला मंदिर हे एक जगप्रसिद्ध मंदिर असून येथे प्रभू अय्यप्पांचे निवासस्थान आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मक्का-मदिनेनंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे तीर्थस्थान म्हणून शबरीमाला मंदिर ओळखले जाते. दरवर्षी करोडो भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. मागील वर्षीच्या आकेडीवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान पाच कोटी भाविकांनी या मंदिराला भेट दिली आहे.

केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवरील पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेवर हे मंदिर आहे. याला दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थस्थानाचा दर्जा दिलेला आहे.

हे मंदिर पूणकवन नावाच्या 18 पर्वतरांगा आणि
WDWD
चोहोबाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेले आहे. असे सांगितले जाते, की महर्षी परशुरामाने शबरीमालेवर भगवान अय्यप्पाच्या साधनेसाठी त्यांची मूर्ती स्थापन केली होती.प्रभू अय्यप्पा यांना भगवान शिव आणि विष्णूचा पुत्र मानले जाते. भगवान विष्णूच्या मोहनी अवतारात त्याच्या रूपावर भोलेनाथ आसक्त झाले होते. त्यांच्या रासलीलेमुळेच भगवान अय्यप्पांचा जन्म झाला असेही सांगितले जाते.

मंडलपूजा (15 नोव्हेंबर) आणि मकराविलक्कू (14 जानेवारी) हे शबरीमालेचे प्रमुख उत्सव आहेत. मळ्याळम पंचांगाच्या (माह) पाच दिवस अगोदर आणि शिशू माह (एप्रिल महिन्यात) या मंदिराचे दरवाजे उघडले जातात. अन्यथा वर्षभर दरवाजे बंद असतात.

WDWD
या दिवशी भाविक प्रभू अय्यप्पाच्या मूर्तीला तुपाने अभिषेक घालतात. येथे येणार्‍या प्रत्येक भाविकाला 'स्वामी तत्वमसी' या नावाने संबोधले जाते. या संबोधनाचा अर्थ संस्कृत सूक्त 'अहं ब्रम्हास्मि' होय. अर्थात येथे येणारा भक्त स्वत:ला देवाचे अभिन्न रूप मानत असतो.सर्वात महत्त्वाची पूजा म्हणजे 'मकराविलक' होय! या पूजेच्या शेवटी भाविक पर्वताच्या शेंड्यावर आकाशात पसरलेल्या पवित्र 'मकरज्योती' चे दर्शन घेतात.

येथे येणार्‍या भाविकाला काही विशेष गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसे मंडलपूजेदरम्यान 41 दिवसांचे विविध उपवास ठेवावे लागतात. शिवाय तामसी प्रवृत्ती आणि मांसाहारापासून दूर रहावे लागते.

फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा...

WDWD
भाविक मुख्यत: समूहाने येतात त्यांचे नेतृत्व करण्यासाठी एक खास व्यक्ती असते. या व्यक्तीच्या हातात एक कपड्यांचे गाठोडे असते ज्याला 'इरामुडी केट्टू' असे म्हटले जाते. येथे सर्व जाती धर्माच्या भाविकांना प्रवेश दिला जातो. केवळ दहा ते पन्नास वर्ष वयादरम्यानच्या महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. एवढेच नाही तर या मंदिराजवळ एक असे ठिकाण आहे की जे तत्कालीन मुस्लिम धर्मानुयायी ववर यांचे (वावरऊंडा) समाधीस्थान आहे.

ते प्रभू अय्यप्पाचे सहकारी मानले जात होते. या खास कारणामुळे विविध धर्माच्या लोकांमध्ये शबरीमाला श्रद्धेचे केंद्र बनले आहे.

केव्हा जावे.....
येथे जाण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याचा
WDWD
कालावधी सर्वांत चांगला आहे. मंदिराचे अनुयायी येथे 41 दिवस कठोर तपस्या करतात. या दरम्यान ते मांसाहार, काम आणि तामसिक प्रवृत्तीपासून दूर राहून प्रभू आराधनेत तल्लीन होतात. या काळात स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. मुख्य कालावधी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यानचा असतो. भाविक आपल्याजवळ इरमू टिकटी नावाच्या दोन झोळ्या खाण्याचे सामान ठेवण्यासाठी ठेवतात.

त्यात तूप आणि पूजेची सामग्री असते. मंदिराची पूर्ण व्यवस्था त्रावणकोर देवासवम बोर्ड करते. येथे निवासासाठी अनेक हॉटेल आणि धर्मशाळा आहेत. परंतु त्यासाठी बरेच दिवस अगोदर नोंदणी करावी लागते.

शबरीमाला येथे कसे जावे....
शबरीमाला येथे पोहचण्यासाठी पंपापर्यंत कोणत्याही वाहनाने जाता येते. पंपानंतर चार किलोमीटर चालावे लागते. हा रस्ता पक्का असून रस्त्याच्या बाजूने आश्रमशाळा, औषधे आणि आवश्यक मूलभूत वस्तूंती छोटी-छोटी दुकाने आहेत. तसेच आजारी लोकांना चढायची परवानगी दिली जात नाही.

WDWD
शबरीमालाजवळ कोट्ट्यम आणि चेंगान्नूर (93 किलोमीटर) नावाची दोन रेल्वे स्टेशन आहेत. येथे सर्व रेल्वे थिरूवनंतपुरम ते एर्नाकुलममार्गे येतात.तिरूवनंतपुरम विमानतळापासून शबरीमाला 175 किलोमीटर आहे. तसेच कोची आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 200 किलोमीटरवर आहे. चालक्यम गावामार्गे विविध साधनांद्वारे किंवा इरूमेलीच्या घनदाट जंगलातून त्यांना करीमाला पर्वतरांगेतून पायी 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

भारतातील पाच प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर

घरात लक्ष्मी पूजन कसे करावे? योग्य पद्धत Diwali Laxmi Puja in Marathi

आजही साजरी होणार दिवाळी; जाणून घ्या लक्ष्मी-गणेश पूजेचे शुभ मुहूर्त

Diwali Wishes 2024 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हीही मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये 1 तासात श्रीमंत होऊ शकता, या 5 टिप्स फॉलो करा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

Show comments