Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नटराज मंदिर चिदंबरम

ओम रूपात शंकराचे अस्तित्व

श्री नटराज मंदिर चिदंबरम
वेबदुनिया
शुक्रवार, 27 जुलै 2012 (12:50 IST)
देवाधिदेव भगवान शंकराचे सर्वोच्च देवतेच्या रूपात पूजन करणा-या भक्तांसाठी तमिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिर भक्तीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. आपल्यातील सर्व पवित्र शक्तींनी महादेव शंकराने या ठिकाणाला पावन केले असल्याची भक्तांचा समज आहे.

WD
पुराणांमध्ये असलेल्या उल्लेखानुसार प्रभू शिव येथे 'ॐ'कारच्या प्रणव मंत्र रूपात विराजमान आहेत. याचमुळे भक्तांसाठी या मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे. हे मंदिर भक्तांसाठी प्रचंड महत्त्वाचे आहे. भगवान शिवाच्या पाच भक्ती स्थळांपैकी चिदंबरम एक असून हे स्थान शंकराचे आकाश क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नटराज मंदिराला अग्नी मूल म्हणूनही ओळखले जाते. भोलेनाथ येथे ज्योती रूपात विराजमान असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे.

WD
इतर चार क्षेत्रांमध्ये कालाहस्ती (आंध्रप्रदेश) किंवा वायू, कांचीपुरमचे पृथ्वी, तिरुवनिका- जल आणि अरुणाचलेश्वर (तिरुवनामलाई) म्हणजेच अग्नी यांचा समावेश आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार याच पंचतत्त्वांनी (पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश) मानवी शरीराची निर्मिती झाली आहे. नटराज मंदिराला अग्नी मूळ या नावानेही ओळखले जाते.

मंदिराची रचना अत्यंत सुबक व आकर्षक असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. चार सुंदर आणि मोठ्या घुमटांमुळे मंदिर भव्य वाटते. मंदिराची अंतर्गत रचना, सजावट, शिल्पकारी आणि मंदिराचे व्यापक क्षेत्रफळ यामुळे ते सहज डोळ्यात भरते.

WD
शिवाच्या नटराज स्वरूपातील मूर्तीमुळे भरतनाट्यम कलावंतांचेही हे श्रध्दास्थान आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर भरतनाट्यम नृत्याच्या वेगवेगळ्या शैली दाखविणा-या मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभा-यात भगवान शिवकाम सुंदरी (पार्वती) सह स्थापित आहेत. मंदिराची देखरेख आणि पूजाविधी पारंपरिक पुजारींकडून केली जात े. मंदिराला भक्तांकडून दिल्या जाणा-या देणगीतूनच मंदिराचे कामकाज चालविले जाते.

शिव क्षेत्रम म्हणूनही मंदिर ओळखले जाते. भगवान गोविंदाराज यांची मूर्तीही मंदिरात शिवशंकराजवळच स्थापन करण्यात आली आहे. मंदिर परिसरात अत्यंत सुंदर तलाव आणि नृत्य परिसर आहे. येथे दरवर्षी होणा-या नृत्य कार्यक्रमासाठी दूरवरून कलावंत सहभागी होत असतात.

कसे जाणा र

रेल्वे मार्ग : चिदंबरम चेन्नई-तंजावर मार्गावर चेन्नईपासून 245 किमी अंतरावर मंदिर आहे. चिदंबरम नावानेच रेलवे स्टेशन ओळखले जाते.
रस्त्याने : चेन्नईहून कुठल्याही वाहनाने 4-5 तासांत चिदंबरमला पोचता येते.
विमान सेवा : चिदंबरम जाण्यासाठी सर्वाधिक जवळचे विमानतळ चेन्नई आहे. तेथून रस्त्याने किंवा रेल्वे मार्गे चिदंबरम जाता येईल.

मारुती स्तोत्र मराठी अर्थासह Maruti stotra with meaning in marathi

Hanuman Jayanti 2025 बजरंगबलींना विशेष नैवेद्य अर्पण करा

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Maruti Aarti मारुती आरती संग्रह

शनिवारची आरती

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

Show comments