Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीचे प्रसिद्ध गणपती पंचायतन मंदिर

- किरण दिनकर जोशी

Webdunia
WD
' सांगलीचा गणपती आहे सोन्याचा, त्याला बाई आवडे भरजरी शेला' अशी असे सांगलीच्या गणपतीबद्दल म्हटले जाते. सांगलीचे आराध्यदैवत श्री. गणपती पंचायतन मंदिर पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै. चिंतामणराव थोरलस आप्पासाहेब पटवर्धन यांनी यांनी या देवस्थानची स्थापना केली. ते जेव्हा सांगलीत आले तेव्हा सांगली केवळ पाच हजार वस्तीचे लहान खेडेगाव होते. या शहरास राजधानीचे रूप देण्याचा संकल्प करून त्यांनी गणेशदुर्ग किल्ला आणि गणपती मंदिर उभारले.

सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असणा-या या मंदिराची श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अलीकडच्या काळात शोभा वाढविली आहे. पंचायतन, अर्थात पाच मंदिरांनी बनलेले. गणपतीबरोबरच शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण देवतांची मंदिरे याठिकाणी आहेत. मंदिराचा परिसर विलोभनीय आहेच शिवाय मंदिरातील प्रसन्न वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करते. थुई थुई उडणारे कारंजे, उंच शिखरे, त्यावरील नक्षीकाम, बागबगिचे आणि मुख्य म्हणजे गणरायाची देखणी मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे.

WD
संस्थानकाळात सन. 1811 ला मंदिरच्या बांधकामास प्रारंभ झाला. मंदिरासमोरील भव्य महाद्वार कुरुंदाच्या दगडात बांधण्यात आले आहे. तर मंदिरांची बनावट काळ्या दगडातील आहे. बांधकाम पूर्णं झाल्यावर 1844 साली पाचही मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. बांधकाम पूर्णं होण्यास जवळजवळ तीस वर्षांचा कालावधी लागला. पाचही मुर्त्यां संगमरवरी आहेत. श्री. क्षेत्र महाबळेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी जो दगड शिल्लक होता, तो उपलब्ध करून या मुर्त्या बनविण्यात आल्या आहेत. भिमाण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांनी या मुर्त्या तयार केल्या आहेत. संस्थान काळातच श्री. गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन करून
त्यामार्फत दररोज पूजाअर्चा सुरू करण्यात आली.

दीडशे वर्षाचा काळ लोटला तरी आजही हे मंदिर नवीन वाटते. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सांगलीत आल्यानंतर त्यांनी मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. अन्नछत्र सुरू केले, उर्दू, जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले. सुनीतीराजे पटवर्धन सभागृह बांधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली. मंगल कार्यालयाची उभारणी करून अनाथ, अपंग जोडप्यांसाठी हे कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

WD
संस्थानचा गणेशोत्सव
गणपती मंदिराप्रमाणेच संस्थान ट्रस्टचा गणेशोत्सव खास आकर्षण असते. गणपती मंदिरची आकर्षक सजावट करण्यात येते. या गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमानंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. हत्ती, उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, पेढ्यांचा वर्षाव होतो. ' पुढल्या वर्षी लवकर या... ' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो.

WD
हत्तींची परंपरा
गणपती पंचायतन संस्थानाची हत्तींचीही परंपरा आहे. पूर्वी मंदिरात पंचवीस हत्ती होते. संस्थान खालसा झाल्यानंतर संख्या कमी झाली. सुंदर गजराज उंचापुरा व देखणा हत्ती सांगलीची शान होता. त्याच्या निधनानंतर बबलू हत्तीचे आगमन झाले. गेली 20 ते 25 वर्षे बबलूने सांगलीकरांना लळा लावला होता. त्याला 'लाडका बबलू' असे म्हटले जात. संस्थानाचा हत्ती असल्याने त्याचा वेगळाच डामडौल होता. श्रीमंत विजयसिंहराजे यांनी त्याच्यासाठी पंखे, शॉवर आणि टीव्हीची सोय केली होती. खाण्यापिण्याचेही लाड होत असत. याचवर्षी त्याचे अचानक निधन झाले. त्याच्या अंतयात्रेवेळी जनसागर लोटला होता.

कसे जाल :
‍ पुण्याहून सुमारे 235 कि.मी तर कोल्हापूरातून 45 कि.मी अंतर आहे.
रेल्वे - सांगली ‍दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असल्याने पुणे-मुंबईवरून याठिकाणी येण्यास थेट रेल्वे गाड्या आहेत.
रस्ता मार्ग - पुणे, कोल्हापूरातून प्रत्येक अर्धा तासाला एस.टी ची सोय.
‍ हवाई मार्ग - कोल्हापूर येथे विमानतळ असून येथून पुणे, मुंबई विमानसेवा सुरू आहे.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments