Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशोकस्तंभ

Webdunia
राष्ट्रपती भवनातील प्रशस्त दरबार हॉलमध्ये विसाव्या शतकातील पहिला राष्‍ट्रीय कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी लोकांनी दरबार हॉलच्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण आणि सर्वांच्या मुखातून गांधीजींच्या नावाचा जयघोष चालला होता. त्या दिवशी हजारो लोकांनी राजघाटावर जाऊन गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती भवनाचा परिसर गांधीजीं व 'वंदे मातरम्' च्या घोषणेने दुमदुमला होता. कार्यक्रमासाठी गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार पटेल, पहिले लोकसभा अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि मनात एकच विचार येत होता की, आज गांधींजी असते तर......

NDND
यावेळी प्रथमच अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह दरबारात आणले गेले. ब्रिटीश सरकारच्या काळात व्हॉइसरॉय बसत असलेल्या गादी शेजारी अशोकस्तंभ ठेवण्यात आला. तसेच गौतम बुद्धाची प्रसन्न प्रतिमा गादीमागे पहिल्यांदाच ठेवण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दरबार हॉमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर लोकांना अभिवादन केले. आपल्या सर्वांसाठी हा एक अवस्मरणीय क्षण असून आपण राष्ट्रपिता व इश्वराचे आभार मानून सुरवात करू असे डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी हिंदी आणि इंग्रजीत केलेल्या भाषणात सांगितले होते.

NDND
राष्ट्रपित्याने जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला. त्या दिवशी देशवा‍सियांनी पहिला प्रजासत्ताक दिन प्रभात फेरी काढून साजरा केला. दिल्लीत कडाक्याची थंडी असूनही लहान लहान चिमुकलेदेखील घराबरोबर पडले होते. त्यांनी हा राष्ट्रीय सण आनंदाने साजरा केला होता.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments