Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाराज हातकणंगलेकर आल्या पावली परत

- किरण जोशी

Webdunia
PRPR
सांगलीत गेल्या वर्षी भरलेल्या ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर व मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यात झालेल्या वादानंतर हातकणंगलेकरांनी साहित्य संमेलनातून नाराज होऊन काढता पाय घेतला. हातकणंगलेकरांना चांगली वागणूकही मिळाली नाही.

डॉ. आनंद यादवांनी राजीनामा दिल्यापासून महाबळेश्वर साहित्य संमेलनाची रयाच गेली आहे. आज साहित्य संमेलन सुरू होऊनही तिथे साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांखेरीज कोणीही उपस्थित नाही. अनेक साहित्यिकांना निमंत्रण देऊनही ते आलेले नाहीत. हातकणंगलेकरांना तर निमंत्रण पत्रिकाही दिलेली नाही. तरीही अशा 'निर्नायकी' परिस्थितीतही त्यांनी येथे येण्याचे मान्य केले होते. ग्रं थ प्रदर्शनाच े उद्‌घाट न आ ज हातकणंगलेक र यांच्य ा हस्त े होणा र होत े. मात् र, त े कार्यक्र म स्थळ ी वेळे त पोचणा र नसल्यान े त्यांन ी तश ी सूचन ा श्र ी. ठाल े- पाटी ल यांन ा दिल ी होत ी. तरीह ी त्यांच ी वा ट न पाहत ा श्र ी. ठाल े- पाटी ल यांन ी ग्रं थ प्रदर्शनाच े उद्‌घाट न स्व त: च केल े. त्या च दरम्या न, श्र ी. हातकणंगलेक र त्य ा ठिकाण ी पोचल े. येथ े उद्‌घाटनावरू न दोघा त वा द झाल ा. य ा वादामुळ े संतप् त झालेल े श्र ी. हातकणंगलेक र निघू न गेल े. हातकणंगलेकरांची यावेळी विचारपूसही करण्यात आली नाही.

माजी संमेलनाध्यक्षांच्या संतापाची परंपरा सांगलीपासून सुरू झाली. सांगली साहित्य संमेलनात नागपूर संमलेनाचे अध्यक्ष अरूण साधू येऊनही समारंभात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे त्यावेळचे संमेलनाध्यक्ष हातकणंगलेकर यांना महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारावी लागली होती. यावेळी डॉ. आनंद यादव यांनी संमेलन सुरू होण्यापूर्वीच राजीनामा देऊन टाकला आहे. त्यामुळे संमेलनाला अध्यक्षच नाही. अशा परिस्थितीत माजी अध्यक्ष स्वतःहून हातकणंगलेकर संमेलनाला हजर राहिले असतानाही त्यांना आल्या पावली परत जावे लागले आहे.

संमेलन कुणाचे?
डॉ. यादवांनी संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कह्यात जाऊन बसले आहे. जणू हे संमेलन फक्त महामंडळाने भरविले असावे असे चित्र आहे. मराठी सारस्वतांनी पाठ फिरवल्याने सर्वत्र पदाधिकार्‍यांचाच काय तो वावर दिसत आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments