Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (19:22 IST)
सध्याच्या काळात कामाच्या वाढत्या ताण मुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे लोक तणावात येऊन नको ते पाऊले उचलतात. नैराश्य हा एक मानसिक त्रास आहे. काही लोक तणाव सहन करू शकत नाही आणि लवकर हार मानतात.तणावामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळते .डिप्रेशन किंवा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत. 
 
* क्वालिटी टाइम -म्हणजे आपल्या कुटुंब आणि मित्रांसह दर्जेदार वेळ घालवणे हे नैराश्यावर लढा देण्यासाठी हे उत्तम औषध आहे.आपण आपल्या मित्रांसह बाहेर देखील फिरायला जाऊ शकता.
 
* दुसऱ्यांबद्दल जास्त विचार करणे- आपण स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करतो. तो काय विचार करेल, तो कसे काय माझ्या पेक्षा पुढे जाऊ शकतो. असं विचार करून आपण तणाव ओढवून घेतो.इतरांचा विचार अजिबात करू नका. आपली ही सवय आजच बदला.असं केल्याने आपला ताणच वाढेल.
 
*मन मोकळे करा- आपण आपल्या कुटुंबियांशी किंवा आपल्या जिवलगांशी मन मोकळे करून बोला. आपल्या समस्या त्यांच्याशी सामायिक करा.असं केल्याने तणाव येत नाही.
 
* फोन कमी वापरा- अधिक फोन वापरल्यावर आपण स्वतःपासून आणि इतरांपासून लांब होता. म्हणून फोनचा वापर  कमी करा. स्वतःला आणि इतरांना वेळ द्या. 
 
* स्वतःसाठी वेळ द्या-आपल्याला इतरांसाठी वेळ आहे परंतु स्वतःसाठी नाही आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या आवडीचे काम करा. स्वतःची ओळख बनवा. आवडीचे खावे आणि आनंदी रहावे. आपल्या आवडीचे खेळ खेळा.समाजसेवा करण्याची आवड असल्यास एखाद्या समाजसेवी संस्थेशी जुडल्यास आपले रिक्त मन व्यस्त होईल आणि आपल्याला आनंद होईल.प्रेरक गाणी ऐका.नकारात्मक विचार येत असतील तर नकारात्मक मूड देखील  बदलेल.  
 
* औषधांपासून लांब राहा - अनेकदा लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनानेच डिप्रेशनसाठी औषध घेऊ लागतात. त्याचा धोकादायक परिणाम होतो. या साठी डॉक्टरचा सल्ला घेतल्या शिवाय कोणतेही औषधे घेऊ नका. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टिफिनमधून दुर्गंधी येते का? या ट्रिक अवलंबवा

चिकन नगेट्स रेसिपी

बैसाखीला पारंपारिक कडा प्रसाद कसा बनवायचा

स्वादिष्ट मटार कोफ्ते रेसिपी

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments