Marathi Biodata Maker

Clean Silver चांदीचे काळे पडलेले दागिने किंवा भांडे घरी बसल्या या प्रकारे चमकवा

Webdunia
How To Clean Silver At Home भारतात सोन्या-चांदीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते, परंतु अनेकदा चांदीच्या वस्तू काळ्या पडू लागतात. वारंवार पाण्याच्या किंवा वार्‍याच्या संपर्कात आल्याने चांदीचा रंग काळा होतो. आजच्या लेखात आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की चांदीचे दागिने किंवा भांडे कशा प्रकारे चमकू शकता.
 
चांदी कशा प्रकारा स्वच्छ करावी
सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करा त्यात तीन चमचे मीठ घाला. एक लिंबू पिळा आणि नंतर त्यात चांदीचा दागिना टाका. काही वेळाने चांदी चमकू लागेल.
 
व्हिनेगर
यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करून त्यात 3 चमचे व्हिनेगर टाका. यासोबतच तुम्हाला बेकिंग सोडा देखील वापरावा लागेल, त्यात 2 चमचे बेकिंग सोडा घाला. आता या द्रावणात चांदीचे दागिने दोन ते तीन तास ​​राहू द्या. नंतर काही वेळाने ते थंड पाण्यात टाका, बाहेर काढा आणि कोरडे होऊ द्या. अशा प्रकारे तुमची चांदी नवीन सारखी चमकेल.
 
फॉइल पेपर
एका फ्राय पॅनमध्ये फॉइल पेपर पसरवून घ्या. त्यात 3 ग्लास पाणी आणि मीठ टाका. उकळी येईपर्यंत गरम करा. त्यात चांदीचा दागिना टाका आणि 2 मिनिटांसाठी राहू द्या. नंतर गॅस बंद करुन पाण्यातून चांदी काढा. याने चांदी चमकू लागेल.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

नैतिक कथा : लोभी सिंहाची कहाणी

Interesting facts about India तुम्हाला माहित आहे का? भारतातील हे शहर 'कॉटन सिटी' म्हणून ओळखले जाते

पुढील लेख
Show comments