Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lubricant योनीसाठी हानिकारक ठरु शकतं, त्याचे 5 दुष्परिणाम जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2024 (16:18 IST)
योनिमार्गातील वेदना टाळण्यासाठी आणि शारीरिक संबंध ठेवताना आनंद वाढवण्यासाठी लुब्रिकेंटचा वापर केला जातो. बाजारात विविध प्रकारचे लुब्रिकेंट्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर संबंधांना आनंददायी आणि सोयीस्कर बनवू शकतो. परंतु ते प्रत्येक वेळी किंवा प्रत्येकासाठी इतके अनुकूल नसतात. काही लोकांना याच्या वापरामुळे दुष्परिणाम जाणवू शकतात. खरे तर ते बनवताना अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. अतिशय संवेदनशील भागेवर याचा वापर केल्याने संसर्गाचा धोका वाढतो.
 
प्रत्येकाला लुब्रिकेंट्सशी संबंधित योग्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. लुब्रिकेंट्समध्ये असलेल्या रसायनांचा वापर शरीराला कसा हानी पोहोचवू शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण स्वतःसाठी योग्य लुब्रिकेंट कसे निवडू शकता हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण ल्युब्रिकंट न वापरल्याने देखील समस्या निर्माण होऊ शकतात.
 
विषारी रसायनांमुळे खाज- बाजारात उपलब्ध असलेल्या ल्युब्रिकंट्समध्ये विषारी रसायनांसह इतर अनेक घटक आढळतात, जे नैसर्गिक मायक्रोबायोमवर परिणाम करू शकतात. त्यामुळे जळजळ, खाज सुटणे यासह संसर्गाचा धोका वाढतो. त्याच वेळी ते योनीचे पीएच असंतुलित करतात, ज्यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो.
 
यीस्ट संसर्गाचा धोका - बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रकारच्या ल्युब्रिकंट्सच्या वापरामुळे यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो. यात असलेली रसायने योनीच्या नैसर्गिक पीएच पातळीला असंतुलित करतात. या स्थितीत, योनीमध्ये यीस्टची वाढ वाढते, ज्यामुळे संसर्ग तुम्हाला वारंवार त्रास देऊ शकतो.
 
प्रजनन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव-  ल्युब्रिकंट्समध्ये असलेली काही प्रकारची रसायने प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात. त्यांच्या रसायनांमुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, अशा परिस्थितीत निरोगी प्रजननक्षमता येत नाही. ज्या जोडप्यांना गर्भधारणेचा विचार आहे त्यांनी ल्युब्रिकंट हुशारीने निवडावे.
 
ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि त्वचेची जळजळ- प्रत्येकाची त्वचा सर्व प्रकारची रसायने सहन करू शकत नाही, अशा स्थितीत ल्युब्रिकंट्सच्या वापरामुळे ऍलर्जीचा धोका वाढतो. तथापि या उत्पादनांच्या वारंवार वापरामुळे पुरळ, खाज आणि नागीण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
 
ड्रायनेस- बाजारात उपलब्ध ल्युब्रिकंट्स विशेषत: वॉटरबेस ल्युब्रिकंट, लवकर आणि सहज कोरडे होतात. अशा स्थितीत संबंध ठेवताना इरिटेशन जाणवू शकते. दरम्यान ते पुन्हा पुन्हा अप्लाय करण्याची आवश्यकता जाणवू शकते, ज्यामुळे क्रियाकलापांचा प्रवाह खंडित होतो.
 
योग्य ल्युब्रिकंट कसे निवडावे
योग्य आणि सुरक्षित ल्युब्रिकंट निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की तुमच्या ल्युब्रिकंटमध्ये पॅराबेन्स, ग्लिसरीन आणि पेट्रोलियमसारखे घटक नसतात. याशिवाय ल्युब्रिकंट लेटेक्स, रबर आणि प्लास्टिक फ्रेंडली असावे हे लक्षात ठेवा. तुमच्या ल्युब्रिकंट्समुळे कंडोम फाटणार नाही याची खात्री करणे देखील खूप महत्वाचे आहे. याशिवाय तुमच्या ल्युब्रिकंटचा pH नक्कीच तपासा, कारण त्याचा परिणाम योनीच्या pH वर होऊ शकतो आणि संसर्ग होऊ शकतो. जर तुम्हाला या गोष्टी समजण्यात अडचण येत असेल, तर याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात स्नायुतील वात कसे टाळावे?

आरोग्यवर्धक आवळ्याचा च्यवनप्राश रेसिपी

कंबरदुखण्यापासून झटपट आराम मिळवण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

Face Care : ऑफिसचा थकवा आल्यावरही फ्रेश कसे दिसायचे? या टिप्स जाणून घ्या

शिळे बटाटे पुन्हा गरम करणे धोकादायक, जाणून घ्या त्याचे तोटे

पुढील लेख