Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार्जिंगच्या जुन्या केबल्स ठरू शकतात तुमच्यासाठी घातक, धोका टाळण्यासाठी काय कराल? वाचा

Webdunia
मंगळवार, 5 मार्च 2024 (14:06 IST)
आपल्यापैकी बरेच जण चार्जिंगच्या जुन्या केबल्स वापरतात. जर या केबलचं एक टोक खराब झालं असेल, त्याच्या तारा बाहेर आल्या असतील तर आपण तिथे चिकटपट्टी गुंडाळून काम चालवून घेतो. पण अशा गोष्टी करणं अपघाताला आमंत्रण ठरू शकतं.
 
तुटलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या केबल्समुळे तुमच्या फोनचं किती नुकसान होऊ शकतं याची कल्पनाच अनेक जणांना नसते.
 
तुटलेले, खराब झालेले फोन चार्जर, बाजारातून विकत घेतलेले कमी दर्जाचे चार्जर हे धोकादायक ठरू शकतात.
 
पण यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
 
जेव्हा आपण खराब झालेल्या केबलने फोन चार्ज करतो तेव्हा आपल्याला विजेचा झटका लागण्याची शक्यता असते.
 
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे जगभरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 
कधीकधी अशा प्रकारचा अपघात केवळ खराब झालेल्या चार्जरनेच होतो असं नाही तर जेव्हा आपण आपल्या फोनचे डुप्लिकेट चार्जर वापरतो तेव्हा देखील असे प्रसंग घडण्याची शक्यता असते.
 
ब्रिटनस्थित इलेक्ट्रिकल सेफ्टी इन्स्टिट्यूटने असं म्हटलंय की असे चार्जर 'धोकादायक असू शकतात.'
 
वेबसाइटवर म्हटल्याप्रमाणे, 'आम्ही अनेक बनावट चार्जर गोळा केले आणि त्यातील 98% चार्जर ग्राहकांसाठी धोकादायक असल्याचे आढळले.'
 
त्यामुळे, भविष्यातील धोका लक्षात घेऊन आपण आपल्या फोनसाठी चार्जर खरेदी केला पाहिजे, असा इशारा संस्थेने दिला आहे.
 
आग आणि स्फोटाचा धोका
कमी दर्जाचे किंवा तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त केलेले चार्जर वापरल्याने स्फोट होऊ शकतो.
 
इलेक्ट्रिकल सेफ्टी इन्स्टिट्यूटने इशारा दिलाय की, बनावट आणि खराब झालेल्या चार्जिंग केबल्स आणि चार्जरमुळे फोन जास्त गरम होतात आणि त्यांचा स्फोट होऊ शकतो. यामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं.
 
'निकृष्ट दर्जाच्या केबल्स आणि चार्जरमुळे विजेचा झटका बसू शकतो. फोनला आग लागू शकते, यातून घराला आग लागण्याचा धोका वाढतो.'
 
मॅपियर फाउंडेशनच्या अहवालानुसार, सुमारे 25 टक्के घरांना आग विजेच्या तारांमुळे लागते. आणि यापैकी अनेक प्रकरणांमध्ये मोबाइल फोन आणि चार्जर कारणीभूत असतात.
 
फोनची बॅटरी संपली असेल तर..?
जेव्हा आपण अशा केबल्स आणि चार्जर वापरतो, तेव्हा आपल्या फोनच्या बॅटरीीच क्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि फोन पूर्णपणे खराब होण्याची शक्यता निर्माण होते.
 
असं घडतं कारण खराब चार्जर आपल्या फोनच्या बॅटरीला आवश्यक तेवढी उर्जा देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आपल्या बॅटरीचे आरोग्य बिघडते.
 
जर तुमच्या चार्जरचा किंवा केबलचा काही भाग तुटत आला असेल तर त्यावर चिकटपट्टी गुंडाळू नका.
 
त्यामुळे केबल किंवा चार्जरमध्ये काही दोष असल्यास स्वतःहून कोणत्याही प्रकारे ते दुरुस्त करू नये अशी शिफारस केली जाते.
आपल्या फोनच्या बॅटरीच्या उर्जा आवश्यकतांशी जुळणारा मूळ चार्जर विकत घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
 
चार्जर खराब झाला आहे हे कसं ओळखाल?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खरेदी करताना अस्सल आणि बनावट चार्जरमधील फरक जाणून घेणं यात काहीच अवघड नाही.
 
तुम्हाला फक्त खालील गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे:
 
चार्जरवरील लेबल पहा : ब्रँड आणि गुणवत्ता यामुळे हा दोष लगेच दिसून येतो.
सॉकेटच्या शेवटी पहा : जर ते खूप चमकदार असेल तर अडचणीचं ठरू शकतं.
चार्जरचे वजन : नॉन-स्टँडर्ड चार्जर हलक्या आणि स्वस्त गोष्टींपासून बनवतात. ते आतून पोकळ असतात.
आकार: चार्जर बनावट असल्यास, प्लग सहसा मोठे असतात.

चार्जरची काळजी कशी घ्याल?
आपण आपला फोन चार्जर आणि केबलची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते जास्त काळ टिकतील.
 
चार्जरची केबल अशा प्रकारे गुंडाळा की केबल तुटण्याचा धोका येत नाही. तिला जबरदस्तीने वाकवू नका, सूर्यप्रकाश किंवा गरम ठिकाणापासून दूर ठेवा.
 
अनेकदा चार्जिंग दरम्यान फोनची बॅटरी चार्ज झाल्याचं नोटीफिकेशन येतं. त्यामुळे फोन पूर्ण चार्ज झाल्यावर काढून ठेवा.
 
काही तज्ज्ञ तर बॅटरीचं आयुष्य वाढवण्यासाठी फोन बंद करून चार्ज करण्याची शिफारस करतात.
 
रात्रीच्या वेळी आपण आपला चार्जर काढला पाहिजे अन्यथा रात्रभर चार्ज केल्याने फोनची बॅटरी आणि सोबतच चार्जिंग केबल्ही खराब होऊ शकते.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

कन्सीलर लावल्याने चेहऱ्यावर तडे येतात, या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments