suvichar

तुमच्या जीन्ससाठी वापरा DIY टेक्निक

Webdunia
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (17:21 IST)
प्रामाणिकपणे सांगा, एका ठराविक वेळेनंतर आपण आपल्या त्याच-त्याच जीन्सला पूर्णपणे कंटाळून जातो कि नाही. आणि तोपर्यंत आपली आवडती जोडी आता फॅशनच्या बाहेर गेली आहे. तर काळजी करू नका. आपल्या जीन्सचे DIY करण्याचे १० ट्रेंडी मार्ग येथे आहेत. काय म्हणालात DIY? DIY म्हणजे हे डू-इट-युअरसेल्फ, नवीनतम ट्रेंडनुसार आपली जीन्स कस्टमाइज आणि अद्ययावत करण्याचा एक मार्ग आहे.  चला तर जाणून घेऊया DIY करण्याचे १० ट्रेंडी मार्ग. 
 
फ्रायड आणि रीप्ड
 
चिमटा - गुडघ्यांच्या ठिकाणी डेनिमला समांतर कापून घ्या. त्यातील निळे धागे काढण्यासाठी चिमटा वापरून काढून टाका आणि पांढरे धागे तसेच असुद्या. एकाधिक वॉश केल्यामुळे कालांतराने कडा अधिक नैसर्गिक भासत.
 
सॅंडपेपर - जीन्सच्या पृष्ठभागावर घासण्यासाठी खडबडीत सॅंडपेपर वापरा, ज्यामुळे धाग्यांचा वरचा थर मऊ होईल,  तुमची जीन्स अधिक फ्रायड दिसण्याचा हा एक जलद मार्ग आहे. 
 
कात्री - दुमडलेले कडा कापण्यासाठी कात्री वापरा आणि वॉशद्वारे कडा घासून घ्या. 
 
एम्ब्रॉयडरी - सुई आणि धागा वापरून जीन्सवर सुबक एम्ब्रॉयडरी डिझाईन करू शकता, जीन्सवर भरतकाम जीन्सला नवीन बनविण्यास उत्तम मार्ग आहे. कॉन्ट्रास्ट थ्रेड्स वापरुन भरतकाम टेक्स्ट किंवा छोट्या चैन हि वापरू शकता. तसेच जीन्सवर चामड्याचे तुकडे, चामड्याच्या स्ट्रिप्स, धावते टाके वापरून तुमच्या जीन्सला उत्कृष्ट लूक्स मिळेल.
 
DIY पॅचवर्क - आपल्या जीन्सची दुरुस्ती आणि त्याचे आयुष्य वाढविण्यासाठी हे एक उत्तम तंत्र आहे. गुडघ्या सभोवतालचा भाग फाडून घ्या आणि फाडलेल्या जागेवर पॅचवर्क करा त्यामुळे, जीन्स मजबूत होण्यास मदत होऊ शकते. आपल्याला वेगवेगळ्या शेड्ससाठी डेनिम स्क्रॅप्स, सुई आणि थ्रेड आवश्यक आहेत.
 
बॅज - आपल्या जीन्समध्ये बॅज जोडून वेगवेगळे लुक मिळवण्याचा आणखी एक उत्तम मार्ग. आपल्याला ग्रन्गी मिलिटरी लुक किंवा प्रीप्री स्पोर्टी हवा असेल तरीही बॅज हा आपल्या पोशाखाला वैयक्तिकृत करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
डूडल आर्ट - या हंगामात बाजारात टक्कर देण्यासाठी सर्वात मोठा ट्रेंड म्हणून डूडलचा ट्रेंड चा समावेश आहे, डूडल आर्ट परिधान करायलाही तितकाच मजेशीर आहे. त्यासाठी आपल्याला फक्त एक्रिलिक पेंट्स, काही ब्रशेस आणि आपल्या डेनिम जीन्सची आवश्यकता आहे.
 
आपला डेनिम सपाट पृष्ठभागावर ठेवा आणि आपण डूडल करू इच्छित असलेला भाग चिन्हांकित करा. आसपास भिन्न जाडी डिझाईन आणि पोत यांचे ब्रशेस वापरा. एकदा संपल्यानंतर ड्रायर वापरा किंवा जीन्स सुकविण्यासाठी उन्हात ठेऊ शकता.
 
पेंट स्प्लॅटर - जर तुम्हाला त्वरित ब्रश स्ट्रोक करणे पसंत असेल आपली जीन्स दोन हुकांवर लटकवा आणि पेंटचे वेगवेगळ्या थेम्ब सोडून द्या, शिंपडा.
 
स्टॅन्सिल प्रिंटिंग - आपण लहान असताना प्रथम क्राफ्ट्स वर्गामध्ये स्टेंसिल शिकलात ते आठवा? आपल्या डेनिमवर डिझाईन जोडण्याचा हा खरोखर एक मजेदार मार्ग आहे. डेनिमवर बाह्य स्टेंसिल ठेवा आणि आपल्या जीन्सवर विविध डिझाइन मिळविण्यासाठी पेंटब्रश वापर करा.
 
डिसचार्ज इफेक्ट - तुमच्या डेनिमला ब्लिच केलात तर डेनिमला नवीन फ्रेश लुक मिळेल. पण हे करताना हात मोजे वापरण्यास विसरू नका.
 
ओम्ब्रिफेक्ट - डेनिम तुमच्या जीन्सला ब्लु डेनिमपासून ब्लीच्ड व्हाइट ग्रेडेशन इफेक्ट देते. प्रथम आपल्या जीन्सच्या टोकाचे पाय कंटेनरमध्ये बुडवा, काही इंच खोल. काही मिनिटांसाठी त्यास धरा, काढा, धुवा आणि वाळवा.
 
पेंट ब्रश - ब्लिचमध्ये बुडलेल्या पेंटब्रशचा वापर करून थेट जीन्सवर डूडल करा. हे डेनिममधून इंडिगो रंग काढण्यास आणि मनोरंजक डिझाइन आणि आकृती तयार करते. आपण ब्रश, जॅक्सन पोलॉक स्टाईल वापरुन ब्लीच देखील करू शकता. हे ८० चे अ‍ॅसिड वॉश लुक तयार करते.
 
टवील टेप्स, स्टड आणि मणी - उच्च फॅशन मेकओव्हरसाठी नमुनेदार टवील टेप आणि मणी स्टिच करून आपल्या जीन्सचे परिवर्तन करा. स्टड आणि पिनसह डेनिम सुशोभित करून पंक रॉक वाईब मिळवा.
 
प्रेरणा देण्यासाठी अनेक उत्तम तंत्रे आणि आश्चर्यकारक ट्रेंडसह, पुन्हा कधीही कंटाळवाण्या जीन्ससोबत जुळवून घेऊ नका. आपल्याला फक्त आपली रचनात्मकता टॅप करण्यासाठी रिकामी दुपार आणि आपल्या ब्लूज दूर करण्यासाठी काही सोप्या साधनांची आवश्यकता आहे.
 
श्री. अभिषेक यादव, डिझायनर हेड, स्पायकर लाइफस्टाईल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा

Holi Special Sweet Recipes होळी विशेष लोकप्रिय गोड पदार्थांच्या पाककृती

रिकाम्या पोटी पपई खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

हे सोपे घरगुती उपाय तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवतील

पुढील लेख
Show comments