भिंतींना पेंट करताना.. भिंतींना पेंट करताना हे पाहावे लागेल की, ती कशाची बनलेली आहे. जर भिंतींना काही चिरा पडल्या असतील किंवा ओरखडे पडले असतील तर तुम्ही त्याला योग्य प्रकारे फिनिशिंग करू शकता. त्यासाठी तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा वॉलपुट्टीचा वापरही करू शकता. जर भिंतीची अवस्था खूपच खराब झाली असेल तर प्रोफेशनल मिस्त्रीकडून त्याची योग्य प्रकारे डागडुजी करणे आवश्यक आहे. याखेरीज भिंती या जिप्सम बोर्ड किंवा ड्राय वॉलच्या पातळ कव्हरनेही तुम्ही झाकू शकता.
फिनिशिंग.. भिंतींना सुंदर फिनिशिंग देण्यासाठी त्यांना रंग देणे ही एक चांगली आणि स्वस्त पद्धत आहे. पेंट किंवा रंग हे मुळातच एक अपारदर्शी माध्यम आहे. भिंतींना झाकणे हाच याचा उद्देश असतो. सध्या शेकडो रंग उपलब्ध आहेत. त्यापैकीच एखादा वेगळा रंग तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींसाठी निवडू शकता. इतकंच काय पण फॉक्स फिनिश टेक्निकने तुम्ही एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेडस् आपल्या आवडीनुसार वापरू शकता.
रंगांची निवड.. फिकट आणि डोळ्यांना थंडावा देणार्या रंगामुळे रुम मोठय़ा वाटतात. अशा प्रकारचे रंग हे छोटय़ा रुमसाठी किंवा ज्या भिंतीमुळे घराचे अनेक भाग झाले आहेत अशा भिंतींना जर सौम्य रंग दिले तर ते खुलून दिसतात. गडद किंवा चटपटीत रंग हे मोठय़ा आकाराच्या रुमसाठी चांगला पर्याय आहे. तसेच ज्या भिंतींना फिनिशिंगची गरज आहे तेथेही तुम्ही गडद रंग वापरू शकता. जर एखाद्या मोठय़ा रिकाम्या रुममध्ये प्रकाश कमी येत असेल तर तेथे सौम्य चमकणारा रंग तुम्ही वापरू शकता.
ज्या भिंतींवर रंगांचे पॅच आहेत ते जर अंधार्या कोपर्यात असतील तर त्यावर उजेड पाडून तुम्ही त्या रंगांचा प्रभाव पाहू शकता. तसेच ज्या रंगाचा पेंट आहे त्याच्याशी मिळत्या जुळत्या अँक्सेसरीज आणि फॅब्रिक असणे महत्त्वाचे आहे. या वस्तू रंगाचे पॅच ज्या भिंतीवर आहेत त्याच्या समोर ठेवून त्या योग्य आहेत की नाहीत हे पाहू शकता.