Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांची काळजी घरीच घ्या.....

वेबदुनिया

Webdunia
WDWD
आपले भवितव्य आपण मुलात पहातो. मूल म्हणजे आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता असते. मुलाशिवाय घराला घरपण येत नाही. थोडक्यात आपले जीवन आपल्या मुलाबाळांवर पूर्णपणे केंद्रीत असते. पण असे असूनही आपण त्या मुलांची काळजी किती घेतो? ज्या वयात त्याला जपायचे असते त्या काळात आपण त्याला पाळणाघराची सवय लावतो. आपल्या करीयरची गाडी मार्गी लागावी म्हणून त्या काळात त्याला आपण आई-वडिलांच्या मायेपासून दुरावतो. हे करणे कितपत योग्य आहे?

ज्या वयात मुलांना त्याच्या पालकांचा सहवास हवा असतो त्या वयात पालक त्यांच्या पाळणाघरात दाखल करतात. वास्तविक मुलांची काळजी घरीच घेतली पाहिजे. याच अवस्थेत मुलांना आई-बाबांची खरी गरज असते. काही महिला तर आपली 'फिगर' सांभळण्यासाठी नवजात शिशुला स्तनपान देखील करू देत नाहीत. त्याची काळजी घेण्यासाठी एखादी आया घरी आणतात किंवा त्याला पाळणाघरात दाखल करतात.

मातेचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे. त्यामुळे शक्य असेल तोपर्यंत त्याला मातेने स्तनपान केले पाहिजे. मातेचे दूध बाळाला
  ज्या वयात मुलांना त्याच्या पालकांचा सहवास हवा असतो त्या वयात पालक त्यांच्या पाळणाघरात दाखल करतात. वास्तविक मुलांची काळजी घरीच घेतली पाहिजे. याच अवस्थेत मुलांना आई-बाबांची खरी गरज असते      
रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करत असते. आईच मुलाची योग्य काळजी घेऊ शकते. परंतु, आता जमाना बदलला आहे. महिला नोकरी करत असल्याने त्यांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होत असते. विभक्त कुटुंब पध्दती ‍उदयास आल्यापासून घरात नवरा व बायको, आजी-आजोबा घरात कुणीच नसते. त्यातच पती-पत्नी कामाला गेल्यानंतर मुलांची काळजी घेणार कोण? आया किंवा पाळणाघरे. सकाळी कामावर जाताना मुलांना पाळणाघरात सोडायचे अन् सायंकाळी घरी आणायचे हाच नित्यक्रम झाला आहे.

मुलांचा विकास अशाने खुंटतो. काही मुलांच्या बुध्दीचा विकास होत नाही व त्यामुळे त्यांना मतिमंदत्व येते. मुले जशी मोठी होत जातात तशी पालकांकडे पाहण्याची त्यांचा मानसिकता बदलते. बालवयातच मुलांमध्ये अपराधी भावना निर्माण होतात. घरापासून तसेच पालकांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या मुलांमधूनच भविष्यात मोठा गुन्हेगार निर्माण होतो. हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी पालकानी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे