Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तात्पर्य कथा : पोपट

Webdunia
बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (16:27 IST)
एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठय़ा व सुंदर पिंजर्‍यात ठेवले होते. तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती, तरी ही तो मनात नेहमी झुरत असे. 'माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात अन् या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात. तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल.'
 
एके दिवशी चुकून पिंर्ज‍याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. या पिंजर्‍यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली. तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला. चमचमाट, ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला. त्या बिचार्‍या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती. शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला. 'मला जर पुन्हा त्या पिंजर्‍यात जाता आले, तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा इच्छा कधीही करणार नाही.'
 
तात्पर्य : ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान.
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

लक्ष्मीपूजन विशेष नैवेद्य : सोप्पी रेसिपी पेढा

दिवाळीत अशा प्रकारे चेहऱ्याची चमक वाढवा,या कॉन्टूरिंग मेकअप टिप्स अवलंबवा

Firecrackers Burning Remedies : फटाक्याने हात भाजल्यास हे उपाय करा

Career in MBA Family Business Management : एमबीए फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर

पपईच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Show comments