Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाचा निर्णय

अरुणा सबाने
'
NDND
काय भाऊजी, कुठवर आलय तुमचं बधू संशोधन'
' वधू संशोधन तर केव्हाच बंद केलय वहिनी मी'

हे काय? लग्न करून मोकळे झालात आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही
छे लग्न कुठे केलय? उलट आता लग्न करायचं नाहीयं असं ठरवलयं मी

भलतंच काहीतरी काय ठरवताय, अजयराव तुमच्यां सारख्यला पाहिजे तशी बायको चुकटीसरशी मिळेल. तुम्ही लवकर लवकर मुली बघा.
नको बुवा. आपण एकटा जीव सदंशिवच बरे आहोत. आपल्या स्वतंत्र्यावर उगाच कुणाचा घाला नको. अजय भाऊजी आणि माझ्यात थोड्याफार फरकानी हा असला संवाद नेहमी चालालचा. अजयराव आता चक्क पस्तीशीला टेकलेत. वकील, घरी चांगली सुबत्ता, एकुलते एक, कशाचा दबाव नाही, कुणशची कटकट नाही, पण लग्न म्हटलं की यंच्या अंगावर जणू पालच पडते. त्यांच्या घरचे सगळे सतत आमच्यामागे लागलेले की, अजयला लग्नाला तयार करा.

खरं म्हणजे लग्नही प्रत्येकाची स्वत:ची वैयक्तिक बाब आहे. त्यात मुलाला किंवा मुलीला पूर्ण स्वातंत्र्य असायलाचं हवे. पण आपल्याकडे लग्नातली नजाकतता, त्यातलं सगळं माधुर्य मधले लोक पार नष्ट करून टाकतात. दोघांच्या लग्नात मधल्याच लोकांचा इतका गोंधळ असतो की, सत्यनारयण आटोपेपर्यंत वधू-वरालायाचा विसरचं पडतो की, लग्न आपलंच व्हायचच. अजयला का कोण जाणे, पण लग्न करण्‍यात उत्साह वाटत नव्हता. त्यांना खूपदा आम्ही 'लग्न कधी करणार? असं विचारायचं नि तो विषय तिथेच सुटून जायचा. पण अजयचे आई-वडील, बहिणी सगळे आमच्याच मागे, खरं तल लग्नासारखा महत्त्वाचे निर्णय हे आपणच आपले आपल्यालाच घ्यावे लागतात. फक्त निर्णय घेण्याची पार्श्वभूमी तयार करण्‍याचे काम आपल्यासरखे मित्र करू शकतात. खुपदा काही गोष्टींचा निर्णय घेतांना आपल्या मनावर आधीपासून ज्या गोष्टीचा ठसा उमटलेला असतो, त्याच गोष्टी इथे गृहीत धरल्या जातात. ही गृहितं आपल्या मनावर इतकी घट्ट बसलेली असतात की, त्यात आपल्या निर्णयामुळे, आपल्या कृतीमुळे काही फरक पडू शकतो यावर त्यांचा विश्वासच राहात नाही. खरं तर यासाठी आपल्या मनाची आपल्या निर्णयाची शाश्वती असायला हवी आणि म्हणूनच आपल्या मनाची पारख करून घेणे आवश्यक असते.

लग्न होऊन पती-पत्नी एकत्र राहायला लागलीत की, सगळ्याच गोष्टीत दोघांचे एकमत होईलच हे सांगता येत नाही आणि ते शक्यही नसते. दोघेही वेगवेगळ्या वातावरणशतून वेगवेगळ्या घराण्यातून आलेले असतात. त्यांचे संस्कार वेगळे असतात, त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांची मतभिन्नता ही एक साधारण बाब असते. पण प्रत्येक गोष्टीत दोघांनीही आपलेच म्हणणे ताणून धरले कर तिथे वाद निर्माण होतोच. मग वादाचे रूपांतर भांडणात आणि भांडणांचे रुपांतर भयंकर प्रलयात कधी आणि कसे होते हे सांगता येत नाही. हे सगळे टाळण्यासाठी दोघांजवळही समजूतदारपणा असणे आवश्यक आहे. दोघांनहीही परस्परांना समजून घेतले, दोघांनीही एकमेकांच्या मताची कदर केली, तर घराला रणभूमीचे स्वरपू येणार नाही. पण आजकाल सुशिक्षित कुटुंबात सुद्धा त्यांचे कौटुंबिक कलह अशा रूपाला येऊन पोहचले आहेत की, घरोघरी सतत युद्ध सुरू असते. आपल्या भांडणाचा परिणाम मुलांवर, शेजार्‍यांवर, आपल्याकडे येणार्‍यांवर काय होतो याचा दोघेही विचार करीत नाही. बरे त्यांची भांडणे फार गहन विषयावर असतील असेही नाही. अनेकदा फार मोठ्या भांडणांचे कारण अतिशय क्षुल्लक असते. दोघेही भांडणे मिटल्यावर जेव्हा कालच्या भांडणांच मूळ शोधतात, तेव्हा ते इतके क्षुल्लक मिळतं की, दोघांनाही हसू आल्याशिवाय राहत नाही. भाजीत मिठ टाकलेलं नाही म्हणून पत्नीच्या अंगावर ताट भिरकावणारे किंवा उलट उत्तर‍ दिले म्हणून बायकोला फुटबॉलसारखे उचलून दूर फेकणारे महाभाग सुद्धा आपल्या बघण्यात आहेत.

लग्नासारखे सुंदर, रोमॅन्टिक जग त्याचे कितीतरी मधुर स्वप्न तरुण-तरुणींनी बघितले असतात. ' लग्न' म्हणजे पहाटे पडलेले एक सुंदर स्वप्न अशी ज्यांची कल्पना असते त्या तरुण-तरुणींनी जर जोडप्यांचा हा असा सतत युद्धाचा प्रसंग बघितला तर त्यांच्या मनातला लग्नाविषयीचा गोडवा संपल्यास काय नवल? संसार म्हणजे मग तरुणांना कटकट वाटणार नाही तर काय?

अजयचे नेमके असेच झालेले आहे. त्याच्या नातेवाईकात त्याच्या समोर आलेल्या तीन-चारही लग्नाची गत थोड्याफार फरकाने अशीच झालेली. लैकिकदृष्टया सगळ्यांचा संसार अगदी मजेत आहे. दिसायला सुखी कुटुंब आहे. पण चार भितींच्या आड सतत भांडण, कलह, मारमीट, शिवीगाळ, संसाराचा नुसता बिचका झालाय. अजयनी हे सगळे फार जवळून ‍बघितले. लग्नानंतर पुरुषांचे स्वभाव फार हेकेखोर, हट्टी वाटतात, तर अनेक स्त्रिया आपल्या माहेरचा तोरा, शिक्षणाचा, पैशाचा, सौंदर्याचा तोरा मिरवतात. 'हम भी किसीसे कम नही' अशी दोघांचीही भावना.

अजय म्हणतो, 'पती-पत्नीला एकमेकांबद्दल इतका दु:स्वास वाटतो तरी ते एकत्र राहूच कसे शकतात? अशा वातावरणात त्यांच्या मुलांचे जन्म कसे होतात? मी तर सारखे सारखे नवरा-बायकोची भांडण बघून उबून गेलोय, मला लग्न या विषयाचाच अतिशय कंटाळा आयाल. अजय दु:ख आणि संतापाने बोलण्यापेक्षा उद्वेगानेच बोलत होता.

पालकांच्या वर्तनाचा मुलांच्या भावजीवनावर आणि व्यक्तिविकासावर कोणता आणि कसा परिणाम होतो, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. पण अजयच्या उदाहरणावरून तर वाटते की, ह्याचा परिणाम फक्त मुलांच्याच जीवनावर होत नाही तर आजूबाजूला देखील या सांसारिक कटकटीचे पडसाद उमटतात.

अर्थात अजयला आम्ही सांगितले की, तुम्ही हसमुख आहात, मनमिळावू आहात, तुमच्यासोबत कुणाचेही पटेल, दुसर्‍यांचे जे झाले तेच आपलंही होईल असे का वाटते तुम्हाला? त्याच्या वैवाहिक जीवनाशी तुमचा काय संबंध?

त्याच्या मनात घोळत असलेल्या समस्येला शब्दरूप देण्याची संधी आज त्याला मी प्राप्त करून दिली होती. त्याच्या मनातल्या संदिग्ध भावना ए करूप करण्याचा त्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा. सर्वसाधारण मानवी मनामध्ये अशा अनेक भावभावना विचार किंवा समजूती संदिग्धपणे किंवा धुसरपणे वावरत असतात. त्यांना शब्दरूप द्यायला काहीशी भीती वाटत असते. अशा भावना आपण स्पष्टपणे व्यक्त करण्याचे टाळतो. परंतु शांतचित्ताने स्वत:शी विचार केला असता, त्या भावना शब्दरूपात मांडल्या असता त्यातील संदिग्धपणा नाहिसा होतो आणि परिस्थितीशी आपण हातमिळवणी करू शकतो.

अजयचही नेमके असेच झाले. त्यानी मला सांगितले, मला अशी भिती वाटते की, माझ्या पत्नीला मी प्रेमाने वागवू शकणारी नाही, लग्नानंतर माझ्यातला पुरुष जागा होईल आणि मी माझ्या पत्नीला त्रास देईल, परंतु कुणा दुसर्‍यासमोर मात्र आम्ही किती सुखी कुटूंब आहोत असे नाटक वठवील. या दुटप्पी वागण्याची मला चीड येते. मला नवरा-बायकोच्या भांडणाचाच वीट आलेला आहे. म्हणूनच मला लग्न करावसंच वाटत नाही.

अजयच्या मनाचा गुंता हा असा होता. इतर जे करतात तेच आपण करू की काय, ही निव्वळ भीती त्याच्या मनात ठाण मांडून बसली होती. तुला मैत्रिणीची गरज वाटते काय?

हो मला मैत्रीण अतिशय आवडते.
मग तू लग्न कर आणि पत्नीला मैत्रीण समज.
तू लग्न कर. लग्नाचा निर्णय हा पूर्णपणे तुझ्या एकट्याचा आहे.
अजयनी हसत हसत माला सल्ला स्वीकारला. कारण त्याच्या मनातली भीती हळूहळू घालवण्यात मी सफल झाले होते.

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

Show comments