suvichar

अस्त

गोविंद काळे

Webdunia
WD
ठेवोनी अस्ताचे भान। पालटोनी रूपे तीन।

सूर्य करी उधळण प्रकाशाची।।1।।

म्हणोनी साठा संपेना। तत्त्व कळो धनिकांना।

आणि सार्‍या श्रीमंताना निसर्गाचे।।2।।

कवी सांगे गमक। आहे सारेच क्षणिक।

तेणे बदलणे ठीक जीवनात।।3। ।

धन, संपत्ती, पैसा-अडका हे संपणार आहे, नाशिवंत आहे, कायम स्वरूपी नाही. याचं घडलेलं उदाहरण म्हणजे एका धनिकाच्या वाडय़ासमोर माझ लहानपणी दिवाळी सण साजरा व्हायचा तेव्हा फटाके उडविले जायचे. त्यामधील न उडालेले (फुसक्या) फटाके गोळा करून चार गरीब मुलांची दिवाळी साजरी व्हायची. पण तोच वैभवी वाडा धनिक कंगाल झाल्याने विक्रीला निघतो तेव्हा वाईट वाटतं आणि प्रश्न पडतो, असं का झालं? धनिकांनी उधळलं नसेल एवढं वैभव सूर्याने प्रकाशाच्या रूपानी उधळूनही त्याचा साठा संपलेला नाही मग धनिकच कंगाल का झाला तर सूर्याला अस्ताची जाण होती. आपण मवळणार आहोत म्हणूनच तो सकाळी वेगळा प्रकाश (उन्हं) देतो. दुपारी वेगळे उन्ह आणि सायंकाळी वेगळे पण धनिकाला वाटलं आपल वैभवाला अस्त नाही. अशी धनिकाची धारणा झाल्यानेच धनिकाचा वाडा विक्रीला निघाला. निसर्ग आपल्याला शिकवतो पण आपण शिकत नाही. हेच धनिकाच्या बाबतीत घडलं. शेवटी धन, संपत्ती हे सावलीसारखं क्षणिक आहे, एवढं गमक सर्वाना कळावे हीच इच्छा.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

काचेसारखी नितळ त्वचा मिळवण्यासाठी पुदिन्याचे पाणी प्या, डाग नाहीसे होतील

विड्याच्या पानांचा उपाय डोकेदुखी आणि ॲलर्जीवर रामबाण इलाज आहे, त्वरित परिणाम मिळतील

तळपायाच्या दुखण्यावर ही योगासने प्रभावी आहे

अकबर-बिरबलची कहाणी : राजाचे कोडे

नातं तुटण्याआधी पार्टनर देतो हे 7 संकेत; वेळेत ओळखा

Show comments