suvichar

कासव आणि हंस

Webdunia
ShreyaShreeya
एका तळ्यात एक कासव राहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते. ते हंस आणि कासव रोज गप्पागोष्टी करीत असत. एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले. सगळे पशुपक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले. पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यानंतर हंस खूप दुःखी होतात.

शेवटी कासव हंसाना एक उपाय सुचवतो, ''मी एक काठी आणीन. ती मधोमध मी तोंडाने पकडीन. तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा आणि जवळपास कुठे पाण्याने भरलेले तळे असेल तेथे जाऊन राहू.'' त्याबरोबर हंस सांगतात, ''ठीक आहे तुझी कल्पना! आम्ही करू सर्व! पण तुझ्या बडबड्या स्वभावाची भीती वाटते. काही झालं तरी तोंड उघडायचं नाही. तोंड उघडलंस तर खाली पडून मरशील.''

ShreyaShreeya
ठरल्याप्रमाणे दोन्ही हंस कासवाला काठीच्या साहाय्याने उडत घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात एका नगरातील लोकांचे या विचित्र पालखीकडे लक्ष गेले. ते आपापसात बडबडू लागले. गोंगाट वाढत गेला. हा गोंगाट ऐकून कासवाने हंसाला ''हा आवाज कसला?'' हे विचारण्यासाठी तोंड उघडले आणि खाली पडून कासव मरण पावले.

तात्पर्य : मित्राचा योग्य सल्ला न ऐकल्यास प्रसंगी जीवावर ही बेतते.

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

उन्हाळ्यात पौष्टिक अशी 'क्रिमी दही ओनियन चटणी' रेसिपी

पोटाच्या सर्व समस्यांपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय करून पहा, तुम्हाला हे ८ फायदे मिळतील

परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये करिअर करा,पात्रता आणि अभ्यासक्रम जाणून घ्या

ऑफिसच्या थकव्यानंतरही कसे फ्रेश दिसायचे? जाणून घ्या या टिप्स

तुम्ही या ६ लसी घेतल्या आहेत का? त्या प्रौढांसाठी सर्वात महत्वाच्या आहेत

Show comments