Festival Posters

गुप्तधन

अमोल कपोले

Webdunia
मित्रहो, जगात अनेक प्रकारचे मूर्ख आहेत, पण एकाच माणसाने अनेक प्रकारचा मुर्खपणा केलेला पाहिलाय का? मी त्या दुर्मिळ प्रजातीतला प्राणी आहे. आजवर मी सर्व प्रकारचा मूर्खपणा केला. शिक्षण अर्धवट सोडलं, वडिलांच्या पैशांची उधळपट्टी केली, जुगार खेळला, पैसा गमावला. आणि हे सर्व कमी पडलं म्हणून की काय, गुप्त खजिना शोधण्याच्या भानगडीत पडलो.

त्याचं असं झालं. जवळचा पैसा संपल्यावर गुजराण करण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं, म्हणून एका म्हातार्‍याकडे हरकाम्याची नोकरी पत्करली. आता हा म्हातारा होता विक्षिप्त. म्हणजे खुळाच म्हणा, दिवसभर आपला कीडा-मुंग्यांच्या मागे. त्याच्या घरात एक खोली नुसती किडे-फुलपाखरं-नाकतोडे आणि काय काय म्हणतात त्यांनी भरलेली. आता माझ्यासारख्या भणंगाला अशा माणसात काय रस वाटणार?

NDND
पण तरीही मला ती नोकरी सोडाविशी वाटेना, त्याची दोन कारणं होती, एक-पोटापाण्यासाठी मिळवण्याचं दुसरं काही साधन नव्हतं, आणि दोन-त्या विक्षिप्त म्हातार्‍याची गोड तरूण मुलगी, जिचा चेहरा मी कधी पाहिला नव्हता, पण तिच्या नुसत्या वावरानेच त्या घरात चैतन्याचा झरा वाहतोय असा भास व्हायचा. तिच्या एकतर्फी प्रेमात बिमात पडण्याइतका काही मी मूर्ख नव्हतो, तरी तारूण्यसुलभ अपेक्षांमुळे आवाक्यात नसलं, तरी हे हळूवार स्वप्न मी स्वप्न म्हणून का होईना बघत होतो.

अर्थात तिची अपेक्षा करणारा मी काही एकटा नव्हतो. तिच्या विक्षिप्त बापाचा एक विद्यार्थीही, ज्याला आपण रवी म्हणू. संशोधनाच्या निमित्ताने येथे येउन राहिला होता, आणि अर्थातच तिच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. त्याची आणि माझी बर्‍यापैकी मैत्रीही झाली होती. तर या रविला एक वाईट खोड होती, आपल्या शिक्षणाच्या फुशारक्या मारण्याची. तशी ती अगदी टिपीकल बायको आयटम होती. म्हणजे बापाची ज्याप्रकारे ती बडदास्त ठेवत होती, त्यावरून ती एक उत्तम पत्नी होऊ शकेल असं मला वाटत होतं. असो.

NDND
तर घरात तरणी ताठी, देखणी पोरगी असताना दोन तरूणांना मुक्तपणे येण्याजाण्याची मुभा देणारा हा म्हातारा मूर्खच म्हणावा का? तर तसं आम्ही समजत होतो खरे, पण अखेर त्याच्या लक्षात आमचा संभाव्य धोका लक्षात आलाच. मग काय, एका संध्याकाळी त्याने आम्हाला दोघांनाही बोलावून भरपूर दम दिला आणि पुन्हा इकडे दिसलात, तर आयुष्यभर माझ्या प्रयोगशाळेतल्या बरण्यांमध्ये ठेवण्याच्या लायकीचे व्हाल, असा निर्वाणीचा इशाराही दिला.

वादळी वातावरण पाहून आम्ही पाच-सहा दिवस तिच्या घराकडे फिरकलोच नाही. सातव्या दिवशी जाउन पाहतो, तर घर रिकामं. बाप-बेटी सामानासह गायब. माझ्याकडे पैसे असते, तर मी तिला शोधण्यासाठी अख्खं जग पालथं घातलं असतं, मी हताशपणे पुटपुटलो.

‘अरे, पण ती तुझ्या सोबत यायला हवी ना, ’ इति रवी. ‘तुला माहितेय का, तिचं शिक्षण फारसं झालेलं नसलं, तरी ती उपजतच हुशार आहे, त्यामुळे शी डिझर्व्हस दी बेस्ट. आता हे जीवनातलं बेस्ट तुझ्यासारखा भणंग तिला कोठून देणार? ’
‘खरं आहे मित्रा, पण बेस्टची माझी व्याख्या वेगळी आहे, दोनशे एकरची शेती, शंभरावर गुरं-ढोरं आणि दहा खोल्यांचा वाडा असावा, दिमतीला चार-दोन गडी माणसं असावी, आणि फक्त आपल्यासाठी जगणारी बायको हवी. तुझं ते तत्वज्ञान आणि कविता - बिविता आपल्या पचनी पडत नाही.’
त्यावर रवी फक्त हसला..कुत्सितपणे.

तर आम्ही असं एकमेकांना समजावत, डिवचत, आपापल्या परीने त्या दोघांचा माग काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण व्यर्थ. अशात एक दिवस मला जनू भेटला. जनू म्हणजे माझा जुना शेजारी. तो आला एक जुनं-मळकट चिटोरं घेउन, त्यावर कसलासा नकाशा काढलेला.
मी म्हटलं, काय रे बाबा ही भानगड.

NDND
तो म्हणाला, मावळात माझा लांबचा आजा राहायचा, त्यानं माझ्यासाठी ठेवलेल्या ऐवजात हे सापडलं, आपल्या तं काय डोक्यात शिरंना म्हणून तुझ्याकडे आलोय. या आज्याच्या आज्यानं तिकडेच एका डोंगराच्या माथ्यावर दीडेकशे वर्षांपूर्वी गुप्तधन लपवून ठेवलंय, त्याचा हा नकाशा हाय.

नकाशाच होता तो, आमच्या गावापासून शंभरेक मैल दूरवर त्या डोंगर रांगा होत्या. रिकामं बसण्यापेक्षा हाही एक मूर्खपणा करून पाहू, काही हाती लागलंच, तर तिचा शोध घेता येईल, असा विचार करून मी प्रकरण हातात घेतलं. आता या नकाशात गुप्तधनाची जागा दाखवली होती तो डोंगर घोडाच्या खोगीराच्या आकाराचा होता. त्याच्या माथ्यावर एका रांगेत सहा महाकाय शिळा उभ्या आहेत, त्या शिळांच्या खाली गुप्तधन आहे, असं नकाशात म्हटलं होतं.

जन्याला म्हटलं, ‘गुप्त धन सापडलं, तर दोन तृतीयांश वाटा माझा.’ लेकाचा तयार झाला.

आता प्रश्न होता, दीडशे वर्षांपुर्वीच्या जागेचं लोकेशन शोधण्याचा. त्यासाठी आवश्यकता होती, सर्व्हेयरची. पण सर्व्हेयरकडे जाण्याची मला इच्छा नव्हती. शिकलेल्या लोकांबद्दल मला रागच आहे, त्यात रवीमुळे तो वाढला आहे. त्यामुळे सर्व्हेयरकडे जाण्यापेक्षा मीच थोडं व्यवहारज्ञान वापरलं आणि नकाशावरच्या दिशांचा अभ्यास करून ढोबळमानाने ती जागा ढोबरेवाडीच्या पलिकडच्या डोंगररांगांच्या पूर्वेला असावी असा अंदाज बांधला आणि जन्याला बरोबर घेउन मोहिमेवर निघालो.

तालुक्याच्या गावाला तिथलाच सर्व्हेयर गाठला, त्याला नकाशा दाखवून खातरजमा करून घेतली. माझ्या अंदाजानुसार ते ठिकाण पूर्वकडेच होतं. त्याला निश्चित ठिकाण दाखवण्यासाठी बरोबर घेतला. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्हाला ते ठिकाण दाखवून सर्व्हेयर रवाना झाला. दूरवर पसरलेली हिरवी गार कुरणं, पलिकडे वाहणारी नदी आणि नदीपलिकडे ती डोंगररांग. दोन दिवस त्या परिसरात खोगिरीच्या आकाराचा डोंगर शोधण्यात आम्ही घालविले. हाती काही लागलं नाही. अखेर नाद सोडून आम्ही गावी परतलो.

तू जागाच चुकीची निवडलीस मित्रा, रवी कुत्सितपणे हसत मला म्हणाला, सरत्या काळाबरोबर अक्षांशात होणारा फरक तू लक्षातच घेतला नाहीस, म्हणून म्हणतो, आमच्यासारख्या विद्वानाचे सल्ले घेत जा.

‘मग आपण पुन्हा जाऊ, तू म्हणतो त्या जागी शोधून पाहू.’
पुन्हा आमची मोहिम निघाली. रविच्या अंदाजानुसार ती जागा पूर्वेकडे नसून डोंगररांगेच्या मध्याला होती.

पुन्हा गावाकडचा सर्व्हेयर. पुन्हा हिरवी कुरणं. पुन्हा नदी, पुन्हा डोंगरांचा अंदाज. पुन्हा निराशा. तुझा तो खोगीराच्या आकाराचा डोंगर काही सापडत नाही, सापडणार कसा अस्तित्वाच नाही ना, रवि म्हणाला.

आकार हा पाहणार्‍याच्या नजरेत असतो, शेक्सपीयर की शेलीचं वाक्य मी माझ्या संदर्भात वापरलो.
त्यावर रवि कुचेष्टेने खो-खो हसू लागला.
जरा तुझा तो नकाशा पाहू, तो म्हणाला.
मी नकाशा त्याच्या हाती दिला.
त्याने तो सूर्याच्या दिशेने धरला, आणि आतापर्यंत न जाणवलेली एक गोष्ट मला आता दिसली.
त्यावर वॉटरमार्क होता, १८६७ सालचा.
हा नकाशा बनावट आहे, रवि विजयी मुद्रेने म्हणाला, नकाशावर तारीख लिहिलीय, १८३२ आणि नकाशा ज्या कागदावर काढलाय तो तयारच मुळी १८६७ साली झालाय, आहे की नाही गंमत.

नकाशा बनावट असो की खरा, मी गुप्तधन शोधायला त्या डोंगरावर जाणारच. तुला यायचंय की नाही, ते सांग., मी म्हणालो.
रवीला आता मोहिमेत काही रस राहिला नव्हता, त्याने माझा निरोप घेतला.
दोन दिवस मी नदीपलिकडचे डोंगर शोधले, पण तिथे खोगीराचा आकार आणि सहा महाकाय शिळांव्यतिरिक्त सर्व काही होतं, दाट गवत, ज्रगल, आजवर कधीही न पाहिलेले पक्षी, किटक, फुलपाखरं, नाकतोडे...तीन दिवसांच्या रपेटीनंतर आता नदी ओलांडून परतीचा मार्ग पकडावा म्हणून मी डोंगर उतरू लागलो.

नदी काठाजवळ एक म्हातारा, दाढी वाढलेला, एक मोठं फुलपाखरू धरून त्याचं निरिक्षण करत होता.
बिचारा वेडा दिसतोय, असं म्हणून मी नदीच्या दिशेनं वळलो...

तीच. होय तीच होती ती. आज मी तिचा चेहरा प्रथमच पाहत होतो. मला पाहून तिच्या नितळ चेहर्‍यावर हसू उमटलं,
आणि पाठोपाठ स्वप्नवत शब्द कानांवर आले,
मला माहित होतं नाथा, तू येशीलच. बाबांनी मला पत्रसुद्गा लिहायला मनाई केली होती, नाहीतर आपण आधीच भेटलो असतो.

ओ.हेन्रीच्या दी बरीड ट्रेझर या कथेचे स्वैर रूपांतर.

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

Kids Favourite झटपट, चविष्ट आणि डब्यासाठी परफेक्ट रेसिपी भरली चपाती

पाणी प्यायल्यानंतरही तुमचा घसा सतत कोरडा पडतो का? हे या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते

SSC Stenographer Recruitment : १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ७३१ पदांची भरती, संपूर्ण माहिती जाणून घ्या

तुम्ही ५ इंच उंच दिसाल! फक्त योग्य पादत्राणे निवडा

सायलेंट हार्ट अटॅक'ची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

Show comments