suvichar

जाणीव

Webdunia
राहूल नेहमीच बसने कॉलेजात जायचा. रोज कॉलेजकन्यकांचा सहवास त्याला या निमित्ताने मिळायचा. कॉलेजला गेल्यानंतरही त्याची रोमिओगिरी सुरूच असयाची. कॉलेज कट्टा आणि बस स्टॉपवर टुकार मित्रासोबत मुलींची छेड काढणे हा त्याचा रोजचा उद्योग होता. मुलींची छेड काढण्यात त्याचा दिवस जायचा. कॉलेजातल्या मुली त्याच्या या उद्योगांनी त्रासल्या होत्या. राहूल येताना दिसला की त्या त्याच्यासमोरून दबकत जायच्या. तरीही तो त्यांच्याबाबत काहीही कमेंट करायचा. राहूलच्या या जाचाला मुली फारच कंटाळल्या होत्या. एके दिवशी राहूलच्या जाचाला कंटाळून नेहा नावाच्या मुलीने अखेर तोंड उघडलंच. राहूलने तिची छेड काढली आणि नेहाला रहावलं गेलं नाही. त्याला ती ओरडून म्हणाली, 'तुला आई-बहीण नाही वाटतं?' राहूल निर्लज्ज हसून निघून गेला.
NDND

त्याच्या दुसर्‍या दिवशी राहूल लहान बहिणीसोबत बसमध्ये बसून कुठे तरी जात होता. तेव्हा बसमधला एक तरूण राहूलच्या बहिणीची छेड काढू लागला. ते पाहून त्याला नेहाचे वाक्य आठवू लागले. 'तुला आई-बहीण नाही का?' त्याने बहिणीला त्याच्या सीटवर बसवले व तो तिच्या सीटवर बसला. या एका प्रसंगाने आतापर्यंत आपण किती चुकीचे वागलो याची जाणीव त्याला झाली आणि त्याचे डोळे खाडकन उघडले.

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

त्वचेसाठी स्क्रब खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

लंचबॉक्स म्हणजे फक्त जेवण नसतं, तर तुमचं प्रेम असतं! टिफिन मध्ये द्या हे पदार्थ नवरोबा अगदी खुश होईल

नैतिक कथा : खरे सौंदर्य

ही ७ लक्षणं दिसली तर सावध व्हा! शरीर देतंय आजाराची सूचना

पंतप्रधान मोदींची 'झालमुडी'चा सगळीकडे डंका! घरच्या घरी कशी बनवायची? सोपी पद्धत जाणून घ्या