rashifal-2026

दोन बीजं

- सुधा दाते

Webdunia
ND
प्रेमात मशगुल, प्रेमी जीवांच्या हृदयात आले अंतराळातून प्रेमाचे बीज दोन! एका बीजाला छान अंकुर फुटला, नाजूक कोवळ्या पालवीसह, त्याने आकर्षक सुबक रोपाचे रूप धरले. अनुकूलतेचे जलाने त्याला वाढविले, सावधतेच्या उष्णतेने त्याची कीड नष्ट केली. चांगलं जीव धरलेलं ते रोप दिवसामासा छान वाढत जाऊन एका वृक्षात परिणत झालं. सर्वांग सकस असलेल्या प्रेमाची सावली देणाऱ्या मायेचं गार वारा देणाऱ्या झाडाचं रूप त्याला आलं. उत्कर्षाची, जीवन साफल्याची मधुर फळे त्याला लगडली.

जीवनाच्या परीपूर्णतेने नम्रपणे ते झुकलं. जीवन साफल्य लाभलेल्या त्या वृक्षरूपी बीजाला जगाने स्त्री, माता, भगिनी, अर्धांगीनी नावं दिलं.

दुसरं बीजही अंकुर. पालवी, रोप बनण्याची धडपड करू लागलं. फुटली त्याला मीपणाची पाने. अधिकाराच्या दांड्या दांड्या आल्या, अहंकाराची खडबडीत काळसर साल धरली, दुराग्रहाचे काटे त्याला येऊ लागले. मोठं होण्याची हाव त्याला मुळापासून बीजापासून दूर नेऊ लागली. ते झाड डेरेदार फळदार सुगंधी वृक्ष नाही होऊ शकलं. आपल्याच नादात आपल्याच ध्येयात ते उंच आणिक उंच आकाशाकडे झेपावू लागलं, जणू आकाशाच्याही वर जायचे होते त्याला. मग आपला मित्र परिवार नाती-गोती, कुटुंब कबिला त्यांना भेटण्यासाठी ते खाली पाहू लागले.

पण ते सर्व त्यांच्या आवाक्याबाहेर होतं. त्यांचा सहवास, प्रेम ह्या सर्वापासून फार दूर गेलेल्या, आणि आकाश जवळ करू न शकलेल्या वृक्षबीजाला वैफल्याने घेरले. ते मग उंच आणिकच उंच जायच्या प्रयत्नात त्रिशंकू होऊन जगूं लागलं. जगाने त्याला सफल पुरुष हे नाव दिल.

साभार - इंदुर लेखिका संघ, इंदुर.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Kick Day 2026: नात्यातील नकारात्मकता घालवण्याचा दिवस म्हणजे किक डे

Moong Dal Chilla पौष्टिक आणि चविष्ट मुगाच्या डाळीचे धिरडे

गॅसच्या समस्येवर हे सोपे उपाय अवलंबवा

फूड इन्स्पेक्टर बनून करिअर करा

केसांना घनदाट करण्यासाठी दालचिनीचा वापर करा