suvichar

नजर

- प्रकाश दांडेकर

Webdunia
ND
भय्यासाहेब फार मोठे सामाजिक कार्यकर्ता होते. दैवाने त्यांना दिलेल्या गडगंज संपत्तीतून ते नेहमी गोरगरिबांची मदत करायचे. दीन दुःखी कष्टाळूजनांकडे ते नेहमी सहानुभूतीच्या नजरेने पाहायचे. एकदा त्यांच्या कार्यकर्तांनी वीस वर्षाच्या रखमा नावाच्या तरुण मुलीला त्यांच्यासमोर आणले. गावामधून वाहणार्‍या नदीला आलेल्या पुरामध्ये त्या मुलीचे आई, वडील, घर-दार सर्वच वाहून गेले होते.

गरीबाचे कनवाळू भय्यासाहेब त्या मुलीची काही मदत करतील या अपेक्षेनेच कार्यकर्ते तिला त्यांच्याकडे घेऊन आले होते. गावामध्ये आलेल्या भीषण आपदांमध्ये सर्वच गमावून बसलेल्या व दोन वेळच्या जेवणाला ही लाचार झालेल्या निराश्रित रखमाने भय्यासाहेबांकडे अपेक्षेने पाहिले व ती अक्षरशः त्यांच्या पायावर जाऊन पडली. पण मदतीच्या अपेक्षेने भय्यासाहेबांच्या पायात पडलेल्या रखमाला लक्षात आलं, की भय्यासाहेबांची नजर तिच्या सरकलेल्या पदरावर पडली आहे आणि ते एकटक तिकडेच पाहताहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हॉटेलसारखी चटपटीत आणि न चिकटणारी 'मसाला भेंडी' बनवण्यासाठी खास रेसिपी

उसाचा रस पिणे कोणासाठी हानिकारक आहे जाणून घ्या

इसरो मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हे कोर्स करा

लग्नाआधी तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकसाठी हे उबटन बनवा

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या

Show comments