Dharma Sangrah

बांगड्या

Webdunia
ND
शहरातील ठिकठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या अफवांना चांगलाच ऊत आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासन कमालीची सतर्कता बाळगून होते. रेल्वे स्थानक व बस स्टॅन्डवर वाटसरूंच्या सामानाची तपासणी केली जात होती. प्रवाशांनी भरलेल्या बसची तपासणी करण्यासाठी कॉन्टेबल बाजीराव पाटील बसमध्ये चढले. प्रवाशांच्या बॅगा तपासू लागले. तपासणी करत असताना कॉन्टेबल पाटीलचे लक्ष बसच्या शेवटच्या सिटवर असलेल्या कॅरीयरवर ठेवलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीवर गेले. प्रवाशांना वारंवार विचारल्यानंतरही ती काळी पिशवी कुणाची आहे, हे कुणीच सांगत नव्हते.

त्यानंतर बाजीराव पाटीलने सगळ्या प्रवाशांवर नजर टाकली. बसमध्ये पाचव्या क्रमांकाच्या सिटवर बसलेल्या ग्रामीण भागातील तरूणावर गेले. श्री. पाटील ने त्या तरूणाला पोलिसी खाक्या दाखवत विचारले, 'काय आहे या पिशवीमध्ये ?' तरूणाने उत्तर दिले, ' ही पिशवी माझी नाही साहेब.' 'खोटे बोलू नकोस !, असा, पाटलांनी दम भरला गरीब तरूण कॉन्टेबल पाटीलच्या हातपाय जोडायला लागला व म्हणाला, 'साहेब, खरंच ही पिशवी माझी नाही. तुम्ही माझ्यावर उगाच संशय घेत आहात'. पाटलांनी काहीही न ऐकता त्या तरूणाच्या श्रीमुखात भडकावली व म्हणाला, 'साल्या, ही पिशवी तुझी नाही तर का आस्मानातून पडली आहे?' ' तुमच्या सारखे दहशतवादी देशात ठिकठिकाणी बॉम्ब ठेवतात व हजारो नागरिकांचे प्राण घेतात.' असे म्हणून त्याला 'पिशवी उचलून पोलीस स्टेशनला चल, असा आदेश दिला.. तो तरूण जोरजोरात रडू लागला. 'साहेब, ही पिशवी माझी नाही' म्हणत श्री. पाटील यांची विनवणी करत होता. तेवढ्यात एक गरिब वयोवृध्द महिला बसमध्ये चढली व ती काळी पिशवी उचलून पुन्हा बसच्या खाली उतरू लागली.

' आजी ही काळी पिशवी तुमची आहे? असे कॉन्टेबल पाटीलने त्या महिलेला टोकले. 'होय, ही माझीच पिशवी आहे' तिने ठामपणे सांगितले. 'काय आहे त्या पिशवीत?' असे म्हणून पाटील त्या महिलेवर कडाडले. तेव्हा ती महिला म्हणाली, 'बांगड्या!' विकत घेणार?' त्यानंतर त्या महिलेने क्षणात काळ्या पिशवीतून रंगबिरंगी बांगड्या काढल्या व कॉन्टेबल पाटीलला दाखवू लागली. तिच्या या उत्तराने आतापर्यंत गंभीर असलेले वातावरण हास्यकल्लोळात बुडाले. कॉन्टेबल पाटील शरमेने चांगलाच खजील झाला.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

मिठाईवाल्यांप्रमाणे कुरकुरीत आणि लुसलुशीत जिलेबी कशी बनवायची? लिहून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात जांभूळ खाण्याची योग्य पद्धत व फायदे जाणून घ्या

RBI Grade B Recruitment 2026 : भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रेड बी ६० पदांसाठी भरती, पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

दररोजच्या प्रवासामुळे तुमच्या केसांचे नुकसान होत असेल, तर केसांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पहा

पोटावरील सूज आणि वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते

Show comments