Festival Posters

मनाचे सौंदर्य

- प्रकाश दांडेकर

Webdunia
ND
राहुल आणि मी लहानपणापासून जीवलग मित्र होतो. शाळेपासून कालेजपर्यंत आम्ही बरोबर शिकलो. एकमेकांची अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी आम्हाला माहीत नव्हती. हाच आम्ही दोघांच्या मैत्रीचा आधारस्तंभ होता. कॉलेजच्या शिक्षणानंतर आम्ही दोघं नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये निघून गेलो. मला बेंगलुरूमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब मिळाला. राहुल मुंबईमध्ये एका एड कंपनीत असिस्टंट म्हणून काम करत होता.

दोघं सकाळ संध्याकाळपर्यंत बिझी असायचे. त्यामुळे कधी-कधी फोननेच एकमेकाची खुशाली विचारायचे. राहुलचे काही सहकारी बेंगलुरूचे होते. ते कधी घरी आल्यानंतर मल भेटायचे. मी पण त्यांना राहुलचे एकंदर कसे काय चालले आहे या बद्दल विचारपूस करायचो. त्यांच्याकडूनच मला माहिती मिळाली की राहुलचे एका सुंदर मुलीशी प्रेम जमल्याचे कळले. तिचं नावही सुरेखाच होते. सुरेखाचे रूप, प्रसन्न चेहरा व लाघवी बोलण्यावर बरेच जम 'फिदा' होते, पण लग्नाची लॉटरी शेवटी राहुलच्याच नावाने निघाली. त्यामुळे त्याच्या मित्रांना त्याच्या भाग्याचा हेवा वाटत होता. काही तर इर्ष्याही करू लागले.

काही दिवसाने ऑफिसच्या कामानिमित्त तीन महिन्याकरिता मलेशियाला जावे लागले. तिथून आल्यावर कळले की राहुलचे लग्न सुरेखाशी झाले आहे. मला माझा मित्र लग्नात बोलवायला कसा विसरला याचे आश्चर्य वाटले. त्याच्या लग्नामध्ये सहभागी होता आले नाही यांची खंतही वाटत होती. पण राहुलचे लग्न त्याच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर मुलीशी झाले याचा आनंदही वाटत होता.

आता मला राहवले गेले नाही. मला पण मित्राच्या सुंदर पत्नीला पाहायची उत्कंठा लागून गेली होती. मी मुद्दाम आपल्या मित्राला भेटण्याकरिता मुंबईला गेलो. त्याला तसा फोनही केला. वहिनींना पहायला येतोय, असेही सांगितले. त्याने थेट जेवायचेच निमंत्रण दिले. 'सुरेखाची इच्छा आहे, तशी असे सांगून जेवायला आल्यावर मनसोक्त गप्पा मारू असेही तो म्हणाला.

मी संध्याकाळी सात वाजता राहुलच्या घरी पोहोचलो. मित्राने तयारी करून ठेवली होती. डायनिंग टेबलवर ताट, वाट्या, भांडी सजवून ठेवली होती. जेवण सर्व्ह करण्यासाठी 20 वर्षांची मुलगीही होती. मी तिच्याबद्दल विचारल्यावर राहुलने सांगितले की ती सुरेखाची लांबची बहीण आहे. काही दिवसांसाठी इथे आली आहे. आम्ही काही वेळ गप्पा मारत बसलो.

सुरेखा वहिनीचा विषय निघाल्यावर राहुल काही तरी मोघम बोलून विषयांतर करत होता. मला नवल वाटत होत. काही वेळाने स्वयंपाकघरामधून वहिनीचा आवाज आला 'जेवण वाढून ठेवलं आहे भावजींना बसायला सांगा' मी व राहुल जेवायला बसलो. सुरेखा वहिनीची लहान बहीण प्रीती आग्रहाने वाढत होती. काय हवं नको ते विचारीत होती. पण सुरेखा वहिनी अद्याप बाहेर आल्या नव्हता. मधून मधून
प्रीती स्वयंपाकघरामध्ये काही विचारीत होती आणि सूचना मिळाल्याप्रमाणे करीत होती.

सुरेखा वहिनी घरात असूनसुद्धा समोर भेटत का नाही हेही मी राहूलला विचारले, पण त्याने तब्बेतीचे नाही तर कामाचे कारण सांगून वेळ मारून नेली. शेवटी मला वाटलं, आपण गृहस्वामिनीच्या अनुपस्थितीमध्ये चापून जेवतो आहे हे काही योग्य नाही म्हणून मी राहुलला म्हटले - 'राहुल आता तर हद्द झाली. तू माझी वहिनींशी भेट घातली नाहीस तर तुझी आणि माझी आजची ही शेवटची भेट राहील. आपल्या इतक्या वर्षाच्या मैत्रीवर पण 'फुल स्टॉप' लागेल.

  मी राहुलच्या घरातून निघालो तेव्हा मला प्रेमाच्या अलौकिक स्वरूपाचे दर्शन घडले होते. त्याची छाप आयुष्यभर माझ्या मनावर कोरून रहाणार होती.      
राहुल म्हणाला, 'अशोक तुला सुरेखाला पाहायचं असेल तर सावध राहा. असं सौंदर्य तू कधी पाहू शकणार नाहीस. त्याने सुरेखाला हाक मारली. सुरेखा वहिनी स्वपंयाकघरामधून समोर आल्या, त्यांना पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कल्पनेहून सुंदर असलेल्या सुरेखा वहिनींचा चेहरा तोंडावर एसिड पडल्यामुळे अत्यंत विद्रूप झाला होता. जळलेला चेहरा, कातड्यांमधून वर येणारी हाडं आणि डोळ्याच्या ठिकाणी दोन खळगी. इतका भयानक चेहरा मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. माझा मित्र राहुल आता आयुष्यभर त्यांच्याशी संसार करणार होता.

शेवटी राहुलने तिच्या चेहर्‍याच्या विद्रुप होण्यामागचे कारण सांगितले. सुरेखाशी लग्न ठरल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बाळगणार्‍या काही विघ्नसंतोषी मित्रांनी तिच्यावर एसिड टाकून तिला विद्रूप करून टाकले. पण मित्रा मी सुरेखाच्या फक्त रूपावर नव्हे तर तिच्या मनावर प्रेम केलं होतं म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. आजही ती मला जगातल्या कोणत्याही सुंदर स्त्रीच्या अगदी एलिझाबेथ टेलर किंवा मोनालिसापेक्षा ही सुंदर वाटते. कारण मी तिच्या पवित्र नि निर्मळ मनावर मी प्रेम केले आहे.

मी निघताना सुरेखा वहिनींना म्हटलं, 'वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्यावर प्रेम करणारा नवरा तर तुम्हाला आहेच, पण तुम्हा दोघांच्या पवित्र प्रेमाचा आदर करणारा हा तुमचा भाऊही सदैव तुमच्या पाठीशी आहे.

मी राहुलच्या घरातून निघालो तेव्हा मला प्रेमाच्या अलौकिक स्वरूपाचे दर्शन घडले होते. त्याची छाप आयुष्यभर माझ्या मनावर कोरून रहाणार होती.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पु.ल. देशपांडे यांच्या कविता

National Dengue Day 2026: डेंग्यू झाल्यावर शरीरात ही ५ लक्षणे दिसतात दुर्लक्ष करू नका

Uddachi Khichdi Recipe शनिदेवाला अत्यंत प्रिय काळ्या उडदाची खिचडी रेसिपी

तुरटीच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे जाणून घ्या

Career After 12th B.Tech in Electrical and Electronics Engineering:इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments