Marathi Biodata Maker

मराठी कथा : ओझे

Webdunia
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2016 (11:51 IST)
एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी 12 वाजले होते. रणरणत्या उन्हाने बेजार केले होते. एक साधू या मार्गावरून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्याच्या जवळ दोन शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढंच सामान होतं. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं सामान ओझं वाटत होतं, आणि घामाच्या धारा त्याच्या अंगावरून वाहात होत्या. थोडं पुढं गेल्यावर त्याला एक 70 वर्षाची आदिवासी महिला 8 वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उपचारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठय़ा उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
 
साधूने त्या महिलेला विचारलं, ‘आजी, इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही हा उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढय़ाशा ओझ्यानं हैराण झालो आहे.’ त्या वृद्धेनं साधूला नीट निरखून पाहिलं आणि म्हणाली, ‘महाराज, ओझं आपण वाहात आहात, हा तर माझा नातू आहे!’
 
तात्पर्य : खर्‍या प्रेमाने केलेल्या गोष्टीचे ओझे वाटत नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

प्रेरणादायी कथा : योग्य आकलन

Dinner Recipe जीरा राइस दाल तड़का; एक 'क्लासिक' आणि सर्वांचे आवडते कॉम्बिनेशन

उन्हाळ्यात रोज या पदार्थाचे सेवन करा, शरीर थंड राहील

चॅटमध्ये ‘हे’ शब्द वापरत असाल तर सावध! नातं तुटू शकतं

व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता पडेल महाग! ही ५ लक्षणे दुर्लक्षित करू नका; डॉक्टरांचा गंभीर इशारा

पुढील लेख
Show comments