Dharma Sangrah

संस्कार

- प्रकाश दांडेकर

Webdunia
ND
सकाळी सहा वाजता रोजच्या नियमाप्रमाणे मी फिरायला व जॉगिंग करायला निघालो होतो. नुकताच अंधार संपून थोडा थोडा उजेड चहुकडे दिसू लागला होता. रात्री पडलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला थोडा चिखल झाला होता. मी आपलाच तंद्रीमध्ये हळू हळू धावत होतो अचानक रस्त्याच्या बाजूच्या चिखलावर माझा पाय घसरला आणि मी जमिनीवर सपशेल पालथा पडलो. त्याचवेळी मला काही मुलांचा कुत्सित हसण्याचा आवाज आला. मी कसाबसा उठायचा प्रयत्न करून पाहिला. हसणारी मुलं उच्चभ्रू घरातली आणि महागड्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाणारी होती. बसची वाट पाहत तिथे उभी होती. बहुतेक त्यांची बस यायला थोडा उशीर होता. तेवढ्यातच मी पडल्याने त्या रिकाम्या वेळात त्यांची विनासायस त्यांची करमणूक झाली. पडल्यामुळे शरीराला झालेल्या दुखापतीपेक्षा त्यांच्या कुत्सित हसण्याच्या अपमानाची जखम खोलवर झाली.

इतक्यात उष्ण वाळवंटात जणू गार वार्‍याची झुळुक यावी त्याप्रमाणे एक आवाज आला. '' काका तुम्ही कसे पडलात? तुम्हाला कुठे लागले तर नाही ना? थांबा मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतो.'' मी वर पाहिलं, तर एक पेपर वाटणारा दहा वर्षाचा एक गरीब मुलगा मला पडलेले पाहून धावत आला होता. आपल्या छोट्या हातांनी मला उचलायचा प्रयत्न करत होता.

माझ्या तोंडामधून आपसूकच निघाले, 'बाळा, तुझं नाव काय काय? तू कोणत्या शाळेमध्ये शिकतोस?'
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

तेलकट त्वचा आता तुम्हाला त्रास देणार नाही; या ५ सोप्या टिप्स अवलंबवा

शरीरात पित्त वाढल्यावर त्वचेपासून पोटापर्यंत ही लक्षणे दिसतात

मान आणि खांद्याचा त्रास दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

नैतिक कथा : भित्रा ससा आणि बेडूक

Maharashtra Day 2026 Speech in Marathi महाराष्ट्र दिन भाषण

Show comments