Dharma Sangrah

हुषारी

Webdunia
ND
एकदा राधिकाकाकू माळ्यावरचं गजपण काढत होत्या. काम करता करता त्यांनी पाहिलं तर एक बेडूक लाकडांच्या फटीत अडकून बसलेला दिसला. राधिकाकाकूंना पाहून करूण नजरेने तो बेडूक म्हणाला, ' तू मला या जाळ्यातून सोडवलंस तर मी तुझ्या तीन इच्छा पूर्ण करेल'.

काकूंनी होकार दिला आणि त्या बेडकाची सुटका केली. सुटका झाल्यानंतर बेडूक म्हणाला, बाई, मी तुला तुझ्या इच्छा पूर्ण करेन असं सांगितलं खरं. पण एक अट सांगायची विसरलो. तू जे काही मागशील ते तुला मिळेलच, पण तुझ्या नवर्‍याला मात्र दुप्पट मिळेल. एवढं लक्षात ठेव.'

काकूंनी मान डोलवून होकार दिला.

मग बेडकाने काकूंना पहिली इच्छा विचारली. त्यावर काकू म्हणाल्या, ' मला जगातील सगळ्यांत सुंदर स्त्री व्हायचं आहे.' लगेचच बेडकाने इशारा दिला, 'हे बघ, तू सुंदर होशील पण तुझा नवरा तुझ्यापेक्षा सुंदर होईल आणि मग त्याच्या मागे इतर बायकाही लागू शकतील. तेव्हा नीट विचार कर.'

काकू ठसक्यात म्हणाल्या, 'विचार करूनच सांगतेय. कारण त्याच्या मागे कितीही बायका लागल्या तरी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री मीच असेन. त्यामुळे तो मला सोडून कुठे जाणार नाही.'

बेडूक 'तथास्तू' म्हणाला. आणि त्याने दुसरी इच्छा विचारली. काकूंनी आपल्याला जगात सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती बनव असे सांगितले. बेडकाने पुन्हा इशारा दिला. ' तुझा नवरा तुझ्यापेक्षा श्रीमंत असेल.' काकू म्हणाल्या, 'काही हरकत नाही. शेवटी काय आम्ही नवरा बायको आहोत. त्यात आपलं तुपलं काय करायचं. त्याचं तेही माझंच नाही का?'

बेडूक 'तथास्तू' म्हणाला आणि त्याने त्यांची तिसरी इच्छा विचारली.

काकूंनी थोडा विचार केला आणि म्हणाल्या, 'मला ह्दयविकाराचा सौम्य धक्का येऊ दे.'

( ई- मेलवरू न आलेल्य ा कथेच े स्वै र रूपांत र)
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Kids Favourite झटपट, चविष्ट आणि डब्यासाठी परफेक्ट रेसिपी भरली चपाती

पाणी प्यायल्यानंतरही तुमचा घसा सतत कोरडा पडतो का? हे या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते

SSC Stenographer Recruitment : १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ७३१ पदांची भरती, संपूर्ण माहिती जाणून घ्या

तुम्ही ५ इंच उंच दिसाल! फक्त योग्य पादत्राणे निवडा

सायलेंट हार्ट अटॅक'ची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

Show comments