सर्वात आधी मंद आचेवर पॅनमध्ये कोको बटर वितळवून घ्यावे. वितळलेल्या कोकोआ बटरमध्ये हळूहळू कोको पावडर घालावी. तसेच नीट फेटून घ्यावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आता त्यात मध किंवा मॅपल सिरप आणि व्हॅनिला अर्क घालावा. जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गोडाचे प्रमाण कमी करू शकता. तयार मिश्रणात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालावे. यामुळे चॉकलेटची चव आणखी वाढेल. हे मिश्रण चॉकलेट मोल्डमध्ये ओतावे आणि रेफ्रिजरेटरमध्ये 2-3 तास ठेवावे. चॉकलेट सेट झाल्यावर ते साच्यातून काढून हवाबंद डब्यात ठेवावे. तर चला तयार आहे आपले डार्क चॉकलेट रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.