Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sweet Dish : ब्रेड - पनीर रोट्स

Bread - Paneer Rots
Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (08:09 IST)
साहित्य : ब्रेडच्या स्लाइसेस 16, अर्धी वाटी पनीर, दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस, बदाम, काजू 3-4, वेलची पूड, 1 लिंबू, चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग.
 
कृती : पनीर चांगले मळून त्यात काजू, बदामाची जाडसर पूड, वेलची पूड व 1-2 चमचे पिठी साखर टाकून सर्व चांगले मिसळावे. ब्रेडच्या स्लाइसेसच्या कडा काढून त्या पाण्यातून काढून हाताने दाबवव्यात म्हणजे पाणी निघेल. नंतर त्यात पनीरचे थोडे सारण भरावे व अलगद हाताने गोल गुंडाळी करावी. अशा रीतीने सर्व रोट्‍स करावेत व ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे.
 
नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात लिंबाचा रस व पिवळा रंग टाकावा. पाक गरम असू द्यावा. तूप गरम करून त्यात ब्रेडचे तयार केलेले रोट्स हळूहळू तळावे व बदामी रंगावर तळल्यावर गरम पाकात टाकावे. पाकातून काढून ऐका ताटात खोबऱ्याचा कीस पसरवून त्यावर रोट्स घोळावेत व सर्व्ह करावे. हे रोट्स खोबऱ्यामुळे पांढरे व आकर्षक दिसतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ग्रीन नेल थियरी तुमचे आयुष्य बदलू शकते का, काय आहे हे

Dental Health Tips : महिलांनी त्यांच्या दातांची अशी काळजी घ्यावी, ते नेहमीच मजबूत राहतील

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

National Infertility Awareness Week 2025 तरुण महिलांसाठी लवकर प्रजनन चाचणी का आवश्यक?

चेहऱ्यावरील छिद्रे कमी करण्यासाठी या टिप्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments