दुधी ही अशी एक भाजी आहे अनेक जणांना आवडते तर काही जणांना आवडत नाही. पण दुधी आरोग्यासाठी फायदेशीर असतो. दुधी मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, आयरन मॅग्नाशीयम, पोटॅशियम आणि जिंक असे पौष्टिक गुण असतात. दुधीचा हलवा बनवतात पण तुम्हाला माहिती आहे का? दुधीपासून लाडू देखील बनवू शकतो. तर चला लिहून घ्या दुधीचे लाडू रेसिपी
साहित्य-
500 ग्रॅम दुधी
5 मोठे चमचे तूप
250 ग्रॅम साखर
अर्धा कप किसलेले नारळ
2 चमचे काजू
2 चमचे बदाम
2 चमचे पिस्ता
2 चमचे वेलची
कृती-
दुधी धुवून घ्या व त्याचे साल काढून घ्यावे. मग तो किसून घ्यावा. मग हाताने दाबून त्यामधील पाणी काढून घ्यावे. एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये दुधीचा किस टाकावा व दोन मिनिट परतवावे. मग यामध्ये साखर टाकून पाणी कोरडे होइसपर्यंत परतवावे. आता ड्राइयफ्रुट्स जाड बारीक दळून घ्यावे. मग यामध्ये टाकावे. आता दुधीचा किस थंड होऊ द्यावा. मग यामध्ये नारळचा किस आणि वेलची पूड घालावी. तसेच हातावर तूप लावून लाडू वळावे. तयार आहे आपले दुधीचे लाडू, लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.