Marathi Biodata Maker

उपवासाची खांडवी

Webdunia
MHNEWS
साहित् य : दोन वाटय़ा वरीचे तांदूळ, तीन वाटय़ा गूळ, एक वाटी नारळाचा चव, छोटा आल्याचा तुकडा, चिमूटभर मिठ, चिमूटभर केशर, अर्धी वाटी तूप, खांडवी सजावटीसाठी काजू, बदाम चारोळ्या याचाही उपयोग करता येतो.

कृती : प्रथम वरीचे तांदूळ कोरडे भाजून घ्यावे. स्वच्छ धुवून घ्यावेत. तूप गरम करून त्यात टाकावे. आले, नारळाचा चव वाटून तो शिजवायला ठेवावा. त्यात चिमूटभर मिठ, वेलदोडा, केशर टाकावे. वरीचे तांदूळ शिजल्यावर ते परातीत मोकळे करून पसरवून ठेवावे. गुळाचा पाक करून त्यात एक चमचा तूप घालावे. त्यात मोकळे केलेले तांदूळ घालून ते परतून घ्यावे. घट्ट झाले की, तूप लावून त्यावर तो गोळा करून थापावा. जाड वडय़ा पाडाव्यात. सजावटीसाठी काजू, चारोळ्या, बदामाचे काप लावून सजवावेत. गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यावर थापल्या तरी छान दिसतात. आणि लागतातही चवदार.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Show comments