Festival Posters

गुलाब जामून

वेबदुनिया
ND
साहित्य- अर्धा किलो खवा, दोनशे ग्रॅम मैदा, अर्धा किलो वनस्पती तूप, पावभर दूध, साखर अर्धा किलो, विलायची दहा ग्रॅम, बादाम व काजू शंभर ग्रॅम, खायचा सोडा.

पूर्वतयारी- बादाम व काजू मिक्सर मधून काढावे, खवा, मैदा, बादाम, काजू पावडर व खायचा सोडा एकत्र मिसळायचा दूध मिसळून मिश्रण चांगले एकजीव करायचे.

कृती- पातेल्यात साखर घालून आवश्यक तेवढे पाणी घालावे व गुलाब जामून टाकण्यासाठी चाचणी करायची. मंद आचेवर साखरेचा पाक घट्ट येणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाब जामूनची चाचणी हलकी व पातळ असते. खव्याचे तयार मिश्रणाचे छोटे गोलाकार गोळे करायचे. गॅसवर कढई ठेवून वनस्पती तूप घालायचे. तळण्याजोगे तापल्यानंतर तयार केलेले जामून तांबडा रंग येईपर्यत तळायचे.

पूर्ण फ्राय झालेले गुलाबजामून तयार केलेल्या चाचणीत टाकायचे. एक तास साखरेच्या पाकात किवा चाचणीत जामून मुरायला ठेवल्यानंतर फ्रिज मध्ये थंड करायला ठेवायचे. अशाप्रकारे स्वादिष्ट गुलाब जामून तयार.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

संकष्टी चतुर्थीला बाप्पासाठी बनवा अतिशय सात्विक आणि चविष्ट नैवेद्य

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने दम्याचा धोका वाढू शकतो का?

Career in Diploma in ECG Technology Course: डिप्लोमा इन ईसीजी टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

या सोप्या पद्धतीद्वारे घरच्या घरी काही मिनिटांत चमकदार त्वचा मिळवा

वाढता वयात मेंदू कसे तीक्ष्ण ठेवाल, तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यास मदत करणाऱ्या १२ सवयी जाणून घ्या

Show comments