Festival Posters

गुळाची पोळी

Webdunia
ND
साहित् य : अर्धा किलो गुळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, ५-६ वेलदोड्यांची पूड, १ चमचा खोबर्‍याचा किस, अडीच चमचा डाळीचे पीठ, २ वाट्या कणीक, १ वाटी मैदा, आणि २ लहान चमचे तूप असे सर्व साहित्य तयार ठेवा.

कृती : सर्वप्रथ म कणिक, मैदा व अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ एकत्र करुन त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवा. चांगला पिवळा गूळ किसून घ्या. तीळ, खसखस व खोबर्‍याचा कीस भाजून घ्या व नंतर त्यास कुटून घ्या. अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ थोड्या तुपावर चांगले भाजून घ्या. वेलदोड्यांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्या. नंतर कणकेच्या दोन लाट्या जरा लाटून घ्या. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटा. तव्यावर खमंग भाजा. गुळाच्या पोळ्या मात्र गारच चांगल्या लागतात. म्हणून अगोदरच करुन ठेवा. त्या थोड्याशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Career in Bachelor of Technology (B.Tech) in Biomedical Engineering :बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

डार्क सर्कल्सने त्रस्त आहात? मधाचा हा उपाय ठरू शकतो फायदेशीर

वयस्कर स्त्रीला आकर्षित कसं करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ते जाणून घ्या

Delicious Dishes पुदिन्यापासून बनवता येणारे ५ सोपे आणि स्वादिष्ट पदार्थ

लिंबू पाणी प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो का, तज्ञ काय सांगतात

Show comments