rashifal-2026

बासुंदी

पौष्टिक व स्वादिष्ट बासुंदी

वेबदुनिया
ND
साहित् य : 3 लीटर दूध, 20 ग्रॅम इलायची, एक किलो साखर, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मनुका, 50 ग्रॅम चारोळी.

पूर्वतयार ी : साखर निवडून घ्यावी. बदामचे बारीक तुकडे करावे. चारोळी व मनुका निवडून घ्यावी.इलायचीची साल काढावी व बारीक वाटून घ्यावी.

कृती : बासुंदी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे दूध घ्यावे. म्हशीचे ताजे दुध मिळाल्यास अधिक चांगले. गॅसवर अँल्युमिनियमचे जाड व स्वच्छ पातेले ठेवून त्यात दूध तापण्सा ठेवावे. गरम होईपर्यंत गॅसची आंच जास्त ठेवावी. एकदा दूधाने उष्मांक गाठल्यानंतर ते उकळायला सुरवात होते. आता मंदाग्निवर हे उकळणे सुरू ठेवावे.

मोठ्या चमच्याने एकसारखे दूध ढवळत रहावे, महणजे ते भांड्याला लागणार नाही. दूध न लागता घट्ट करणे यात खरे कौशल्य आहे. साधारणतः 50 मिनिटे दूध घट्ट होते. मग त्यात साखर घालून ढवळून घ्यावी.

घट्ट झालेल्या दुधात बदामाचे बारीक तुकडे, इलायची, चारोळी व मनुका घालावी व संपूर्ण मिश्रण ढवळून घ्यावे. पातेले गॅसवरून उतरवून घ्यावे व चवदार, पौष्टीक, स्वादिष्ट बासुंदी तयार!
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी दररोज 1 केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Career Tips: ITI इलेक्ट्रिशियनमध्ये करिअर करा

केस लवकर तेलकट होतात, हे उपाय अवलंबवा

Show comments