rashifal-2026

आई पहिली गुरू

Webdunia
रविवार, 2 सप्टेंबर 2018 (12:38 IST)
5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. हा आपल्या जीवनात आतापर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भविष्यात जे करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा दिवस आहे. आपल्या जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा पर्व साजरा करावा.
 
पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आई. कारण आपल्या जीवनात आपली आई ही सर्वात पहिली गुरु आहे. कारण अगदी गर्भ संस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात होते. आपले अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आई आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करत असते.
 
आईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचं ज्ञान होतं. लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी, दिलेली शिकवण, अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात. लहानपणी दिलेली शिकवण संपूर्ण जीवन त्याचे मार्गदर्शन करत असते.
 
मातृत्वाला पृथ्वीवर देवत्वाचे रूप प्राप्त आहे. आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरुस्थानी आहे. आई ही पहिली गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि आध्यात्मिक गुरू. म्हणूनच शिक्षक दिनी गुरुसह आईच्या पूजनाचे महत्त्व आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments