प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील व्हॅलेंटाईन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फुल देण्यामागचा अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हे जाणून घेऊ आणि आपणही रंगीबिरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू या.
ND
ND
पांढरा गुलाब लवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
ND
ND
लाल गुलाब लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. हे 'माझे तुझ्यावर प्रेम आहे ' हा संदेश हा गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा खरा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.
ND
ND
पिवळा गुलाब माझ्याशी मैत्री करशील काय? हेच जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. पिवळ्या रंगाच्या गुलाबाचे गुच्छ देणे सांगते की तू माझा जीवलग मित्र/मैत्रीण होतास आणि कायमस्वरूपी राहशील. तुम्ही अनोळखी व्यक्तीला हा गुलाब भेट दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते.
ND
ND
गुलाबी गुलाब हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखादी व्यक्ती आणि त्याचा स्वभाव आवडत असेल तर त्याला या रंगाचा गुलाब भेट देऊ शकता. तू मला आवडतोस हा संकेत गुलाबी गुलाब देते.
अशा पद्धतीने प्रत्येक गुलाब आपला वेगळा भाव आणि त्यातील प्रेम प्रदर्शित करतो. या प्रकारे काही फुले निवडून तुम्ही तुमचा व्ह्रॅलेंटाईन डे साजरा करू शकता.