* घराची सजावट करताना खेळणं म्हणून हत्ती ठेवणे शुभ आहे. निःसंतान दंपतीने हत्तीचा जोडा आपल्या बेडरूममध्ये बेडजवळ ठेवायला हवा. * बेडरूममध्ये जिथे दंपती झोपतात, तिथे पितळाचा हत्ती किंवा हत्तीचे चित्र लावणे शुभ मानले आहे.* घरातील ईशान कोणवर धूळ नसावी. त्याजागी टेराकोटाने तयार केलेला हत्तीचा डेकोरेटिव्ह पीस ठेवायला हवा.* सजवाटसाठी ठेवलेल्या हत्तीच्या खेळण्यांवर धूळ बसता कामा नये. हे खेळणी नियमितपणे स्वच्छ करा.* घरातील मंदिरात लहानसा चांदीचा हत्ती ठेवावा. चांदीचा शक्य नसल्यास मातीचा ठेवू शकता.