Marathi Biodata Maker

वास्तुप्रमाणे घरातील सुखसमृद्धीसाठी हे करून बघा

Webdunia
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:26 IST)
'वास्तू' म्हणजे असे घर वा इमारत जेथे राहणारे लोक सुखी, आरोग्यवान व संपत्ती राखून असणारे असा आहे. त्यामुळेच वास्तुशास्त्रात आमच्या पूर्वजांनी घरात शांतता रहाण्यासाठी अनेक उपाय सुचविले आहेत. 
 
1. घरात तयार केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक प्रकारचे थोडेसे अन्न एका थाळीत वेगळे काढून हात जोडून वास्तुदेवाला अर्पित केले पाहिजे. त्यानंतर घरच्यांनी जेवण केले पाहिजे. असे केल्याने वास्तुदेवता त्या घरावर नेहमी प्रसन्न राहते. वेगळे ठेवलेले अन्न नंतर गायीला द्यावे.
 
2. घरात तूटफूट झालेली यंत्रे ठेवू नयेत. ती घराच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे. जर ती घरात ठेवली तर घऱच्यांना मानसिक अशांतता किंवा आजारपणाला तोंड द्यावे लागते. 
 
3. ज्या घरात एका पायाचा पाट असतो, तेथे नेहमी पैशांची चणचण असते. घरातले लोक मानसिक व्याधींनी ‍त्रस्त राहातात. त्यासाठी घरात एका पायाचा पाट ठेवू नये. 
 
4. घरातल्या केरसुणी (झाडू) कधीही उभी ठेवू नये. जेथे पाय लागतील किंवा ओलांडावे लागेल, अशा ठिकाणीही केरसुणी ठेवू नका. तशी ठेवल्यास घरात पैसा टिकत नाही.
 
5. घरातल्या देवालयात तीन गणपती ठेवू नका. जर असेल तर त्यातील एकाला विसर्जित करून द्या किंवा दुसर्‍या ठिकाणी ठेवून द्या. तीन गणपती असतील तर त्या घरात कायमची अशांती राहते. त्या प्रकारे 3 देवींना किंवा 2 शंखांसुद्धा एकत्र पूजाघरात ठेवणे वर्जित आहे. 
 
6. घरातल्या ईशान्य भागात कोणताही पाळीव पशू ठेवू नका. कुत्रे, कोंबडे व म्हैस यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा घरात अशांती पसरते. 
 
7. प्रत्येक घरात तुळस, सीताफळ, अशोक, आवळा, हरश्रृंगार, अमलतास, निरगुडी या पैकी किमान 2 झाडे अवश्य लावावीत. या झाडांमुळे घरात सुख शांती नांदते.
 
8. घरात नेमाने देवाचे पूजन करावे. पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड सदैव पूर्व किंवा उत्तरेकडे असावे. घरात दररोज तूपाचा दिवा लावावा. 
 
9. घराच्या प्रत्येक खोलीचे दिवे एकाच वेळी लावावे. अर्थात प्रत्येक खोलीत प्रकाश पडणे आवश्यक आहे.
 
वरील उपाय केले तर घरातील व्याधी दूर होऊन घरातल्यांना सुख शांती मिळेल व त्यांचा भाग्योदयसुद्धा लवकरच होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दारिद्र्य दूर करतील अक्षय तृतीयेचे हे ५ गुप्त उपाय

Chaitra Amavasya 2026 चैत्र अमावस्या २०२६ काय करावे काय नाही?

पितृ तर्पण आणि घडा दान: अक्षय तृतीयेला मातीचे माठ दान करण्याचे महत्त्व काय?

आरती गुरुवारची

श्री घोरकष्टोद्धरणस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments