Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तुशास्त्रानुसार देवघर

Webdunia
घरात देवघराला अनन्य साधारण महत्त्व आहे. देवघर असे असतेकी परमेश्वारासोबत सरळ आपण संवाद साधत असतो. देवघरातच आपल्याला परम शांती मिळत असते. पूर्वी देवघर घराच्या चौकटीत केले जात नव्हते तर ते घराच्या बाहेर एका बाजूला केले जात होते त्याला सर्वजण मंदिर म्हणून संबोधत होते.

मात्र, लोकसंख्या लक्षात घेता आता जागा अपूर्ण पडू लागली असल्याने घराबाहेर असलेले मंदिर घराच्या आत आले आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार देवघर बांधताना त्याची दिशा व सजावट यांची आधी विचार केला पाहिजे, त्याचे तसं नियोजन केले पाहिजे त्यामुळे त्यापासून सकारात्मक लाभ होतात.

स्थळ : देवघर घरातील उत्तर-पूर्व दिशेच्या कोपऱ्यात असल्याने सुख, शांती, धन, संपत्ती व प्रसन्नता प्राप्त होते. देवघराच्या वरच्या मजल्यावर किंवा खालच्या मजल्यावर शौचालय अथवा स्वयंपाक घर नसावे. तसेच घरातील शिडीच्या खाली देखील देवघर बांधू नये. देवघर हे तळमजल्यावरच खुले व मोठे असायला पाहिजे.

देवाघरातील मूर्त ी : देवघरात कमी वजनाच्या मूर्ती ठेवल्या पाहिजे. त्यांची दिशा ही पूर्व, पश्चिम, उत्तरमुखी असू शकते मात्र दक्षिणमुखी मुळीच नको. परमेश्वराचा चेहरा कुठल्याही वस्तूने अथवा फूल-माळाने झाकला जाता कामा नये. तसेच परमेश्वराच्या मुर्त्या भिंतीपासून साधारण एक इंचापर्यंत दूर ठेवल्या पाहिजे. त्यांच्यासोबत आपल्या माता-पितांच्या प्रतिमा देखील ठेवता कामा नये. भंगलेल्या मुर्त्या देवघरातून काढून त्यांना नदीत विसर्जित करून दिल्या पाहिजे.

दिव ा : देवघरात दिवा हा पूजेच्या थाळीत देवाच्या समोर ठेवला पाहिजे. दिव्यात दोन जळत्या वाती पूर्व व पश्चिम दिशेने ठेवाव्यात.

देवघराचा दरवाज ा : देवघराचा दरवाजा व खिडकी उत्तर किंवा पूर्व दिशेनेच पाहिजे. दरवाजा हा धातूला अथवा पोलादाचा असून भिंतीमध्ये घट्ट केलेला असावा. तसेच देवघराचे छत हे उंच असावे.

इत र : धूप, अगरबत्ती व यज्ञकुंड देवघरात दक्षिण-पूर्व दिशेच्या कोपऱ्यात ठेवावे. घरातील इतर वस्तू अथवा सौंदर्य प्रसाधने देवघरात ठेवायच्या नाहीत. पूर्व दिशाकडे तोंड करून पुजा केली पाहिजे. तसेच दागिने अथवा किंमती वस्तू देवघरात न ठेवाव्यात.
सर्व पहा

नवीन

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

आरती गुरुवारची

गुरुवारी नृसिंह मंत्र जपा, जीवनातील पाप नाहीसे होतील

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सिध्द मंगल स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

Show comments