Festival Posters

ऑफिसची बाह्यरचना अशी करा

Webdunia
तुमच्या ऑफिसची रचना वास्तुशास्त्रानुसार केल्यास व्यवसायास त्याचा नक्की फायदा येतो. सुरवातीला ऑफिसच्या प्रवेशाच्या खोलीकडे म्हणजे बाह्यरचनेकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. ही खोली अत्यंत आकर्षकपणे सजवली पाहिजे. तेथे मंद सुगंध आणि मंद संगीत असल्यास येणारा ग्राहक अर्थातच खुश होतो. अधिकाधिक ग्राहकही यामुळे आकर्षित होतात. शिवाय या खोलीत भरपूर प्रकाश असू द्या. अनावश्यक फर्निचर तेथे ठेवू नका. फर्निचरची गर्दी डोळ्यांना त्रास देते. शिवाय वावरण्यासही अडचण निर्माण होते. पुरेसा प्रकाश नसल्यास ग्राहकाच्या आणि मालकाच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो. त्यामुळे होणारा व्यवसायही होत नाही. फर्निचरने भरलेल्या कोंदट खोलीमुळेही असाच अनुभव येतो.

त्यामुळे प्रवेशाची खोली अतिशय कलात्मकरित्या सजवलेली पाहिजे. या खोलीत एक्वेरीयम म्हणजे माशांचे भांडे ठेवले तरी छान किंवा छोटासा धबधबा ठेवला तर चांगले. पाण्यात सतत फिरणारे मासे हे चैतन्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे जीवनाला आलेला वेग, त्यातले चैतन्य पाहणाऱ्यालाही चैतन्य देते. धबधबा ही अविरत चालणारी प्रक्रिया असते. पाणी खाली पडून पुन्हा येते. हेही चैतन्याचेच एक रूप. ग्राहकाच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यालाही प्रसन्न वाटते.

ND ND  
ऑफिसचे मुख्य दार शक्यतो मोठे असावे. ते छोटे असल्यास येणाऱ्याला मज्जाव केल्यासारखे वाटते. तेथे अडथळा ठेवल्यास व्यावसायिक अडथळेही येतात. अतिशय़ छान असलेले जुने मोठे दार बसविले तर उत्तम. त्यामुळे व्यावसायिकाला ग्राहकाविषयी आदर असल्याची भावना उत्पन्न होते. त्याचवेळी असे दार हे व्यवसायिक यशाचे स्थिरत्व अधोरेखित करते. शिवाय चांगल्या व्यावसायिक य़शाचेही ते प्रतीक आहे. जुने पण खराब दार नकारात्मक प्रभाव निर्माण करते. ते सहजगत्या उघडत नसल्यास, ते करकर करत असल्यास व्यावसायिक अडचणी येतात. त्यामुळे असे दार तातडीने दुरूस्त करावे.

शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची ही ८ लक्षणे सांगतिली आहेत

Mauni Amavasya 2026 मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग: पितृदोषापासून मुक्तीसाठी सर्वात खास उपाय

How to Fly a Kite मकर संक्रांतीला पतंग कसा उडवायचा, मांजा आणि फिरकीसह पतंगांच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या

मकर संक्रांती 2026 रोजी तुमच्या राशीनुसार हे विशेष उपाय करा

सण आला हा संक्रांतीचा कविता

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments