Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घर बांधताना वास्तूचे काही नियम पाळावे!

Webdunia
वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती,  चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड व बांधकाम करताना नियोजन व वास्तूशास्त्रातील मूलभूत नियमांचा आग्रह धरताना बहुतेकजण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नाही, तर घर बांधतच आहोत तर वास्तूचे काही नियम पाळल्यास काय हरकत आहे, असा सरळ विचार त्यामागे असतो.

घर बांधण्यापूर्वी सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे प्लॉट निवड. प्लॉटच्या उत्तर दिशेला किवा पूर्वेकडे मोठा वृक्ष नाही याची खात्री करतानाच दक्षिणेस खड्डा किवा विहीर नसावी याची दक्षता घ्यावी. प्लॉटचा आकार त्रिकोणी नसावा, चौरस किवा समचतुष्कोण आकार घर बांधण्याकरीता आदर्श मानले जाते.

वाकडे- तिकडे व अनियमित आकाराच्या प्लॉटवर बांधकाम केल्यास आर्थिक हानी किवा मतभेदात वाढ होण्याची शक्यता असते. मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूर्व दिशेकडे तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते.

स्वयंपाक घर मोकळे, हवेशीर असण्यासोबतच त्यांची दिशाही लक्षात घ्यावी. गृहिणी स्वयंपाक करताना तोंड दक्षिणेकडे नसले म्हणजे झाले. टॉयलेटसची दिशा व जागा ठरवताना विशेष खबरदारी घ्यावी. दक्षिण किवा पश्चिमेस टॉयलेट्स ठेवल्यास योग्यच. उत्तर दिशेकडील प्लॉटही उत्तम. नदी, तलाव, विहिर, झरे प्लॉटच्या पूर्वेस किवा उत्तरेस असावे. घराचा मुख्य दरवाजा किवा प्रवेशद्वार कोणत्या दिशेने असावे यावंर घराचे सौदर्य खुलण्यासोबतच इतरही गोष्टी निगडीत असतात. घराचा मुख्य दरवाजा ईशान्येस असावा.

अगदी दुसरा पर्यायच नसला तर पश्चिमेकडे दरवाजा ठेवण्यासही हरकत नाही. घर बांधून काही जागा शिल्लक रहावी याची दक्षता घ्यावी. उत्तर किवा पश्चिमेकडचा भाग मोकळा ठेवल्यास चैतन्यात वाढच होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

गुरुवारचा हा सोपा उपाय तुम्हाला श्रीमंत करेल, आर्थिक संकट दूर होईल

आरती गुरुवारची

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments