Dharma Sangrah

वास्तुशास्त्रात असतात 6 छंद, जाणून घ्या!

Webdunia
वास्तुशास्त्रानुसार घर बांधणे एक शास्त्रीय काम आहे. त्याला कलेचे अधिष्ठान आहे. प्रत्येक कलेचा एक छंद असतो. छंद म्हणजे पद्यमय रचना. शास्त्रीय संगीतात छंद योजना, सुर, स्वर, लय यापासून रागाची उत्पत्ती होते व त्याचा रसपूर्ण आनंद आपल्यालामिळतो. वेगवेगळ्या छंदांपासून वेगवेगळ्या रागाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे घरबांधणीतही प्रत्येक घर एक वेगळ्याच छंदात आकार घेते. 
 
यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे घराची आतली रचना, मुख्य दरवाजा, ब्रह्मस्‍थळे झोपायची खोली, देवघर, स्वंपाकघर हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच घराचे बाह्यरूप (Front Elevation) ही तेवढेच महत्वाचे आहे कारण यावरून घराचे चरित्र, राहणार्‍याची मानसिकता, विचार व वास्तुतज्ज्ञाची समयसूचकता दिसते. 
 
वास्तुशास्त्रानुसार 6 प्रकारचे छंद असतात :  1. मेरू 2. खंडमेरू 3. पताका 4. सूची 5. उद्दीष्ट 6. नष्ट. या नावानुसार त्याची (घराची) आकृती असते. जसे मेरू हा याच नावाच्या पर्वताप्रमाणे, खंडमेरू अर्ध्या पर्वताप्रमाणे किंवा खंडित पर्वताप्रमाणे असतो. पताका छंद पताकांसारखा समान एका रेषेत असतो. रूची छंदात वास्तू एकाआड एक सूचीत असते. उद्दिष्ट व नष्ट हे छंद स्थापत्यशास्त्रज्ञ आपल्या विचाराने छंदांना एकत्र करून बनवतो. 
 
वास्तुतज्ज्ञाची लक्षणे :-
समरांगण सूत्रधारानुसार एका स्थापत्याला शास्त्र, कर्म, क्रिया, प्रज्ञाशील तसेच आचरणाने शीलवान असावे लागते. याच्या विश्लेषणावरून हे लक्षात येईल की वास्तुतज्ज्ञाला शास्त्र माहीत हवे. कर्म म्हणजे घर बांधण्याचे प्रयोजन, वास्तु-नियोजन, पदविन्यास याच्या प्रमाणांची माहिती हवी. तसेच प्रज्ञा म्हणजे स्वत:चा विवेकही त्याने वापरावा. शास्त्रांचे व्यावहारीक ज्ञान, शीलवान म्हणजे त्याचे आचरण शुद्ध असून तो राग, लोभ, मद, मोह, मत्सरापासून मुक्त हवा. यानुसार वास्तुतज्ज्ञ ज्योतिष, शिल्प, यंत्र-कर्म-विधी आणि वास्तुशास्त्राच्या इतर अंगांची योग्य माहिती असणारा हवा. या बरोबरच त्याला, आलेख, चित्रकला, काष्ठकला, चुना, धातुविद्याही यायला हवी.
 
वास्तुतज्ज्ञाचे गुण :-
हल्ली वास्तू बांधतांना सौंदर्य आणि टिकाऊपणा यांचा विचार जास्त केला जातो यात नैसर्गिक गोष्टींचा विचार कमी होतो. म्हणूनच आधुनिक वास्तुतज्ञाला आधुनिक घरबांधणीशास्त्राबरोबर स्थापत्यवेदातले वास्तुविषयक नियम, ‍सिद्धांत याचीही पूर्ण माहिती हवी कारण बांधलेल्या घरात राहणार्‍यांना सुख, संपन्न व आरोग्य लाभायला हवे.
सर्व पहा

नवीन

मकर संक्रांतीच्या दिवशी हे खास वास्तु उपाय करा, 12 राशींचे नशीब चमकेल

Black colour on Sankranti धर्मात अशुभ मानला जाणारा काळा रंग संक्रातीत शुभ कसा?

मकर संक्रांतीच्या दिवशी या चुका टाळा, सूर्य दोषामुळे प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते

Pongal Wishes पोंगल २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा

Ekadashi on Sankranti षटतिला एकादशीला मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग; तांदूळ आणि तीळ दान करावे का?

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments