Marathi Biodata Maker

Vastu Tips : वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील वस्तूंना बदला

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2017 (12:37 IST)
वास्तूला अनुकूल बनविण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपयोगी पडते. वास्तुदोष असल्यास घरात अनेक अडचणी, संकटे, दुःख, निराशा यांचे राज्य असते. 
 
घरातील माणसे या दोषामुळे हवालदिल झालेली असतात. अशावेळी या वास्तुशास्त्राचे बोट धरून गेल्यास सुख, समृद्धी, समाधान घरात नांदते. म्हणून या शास्त्राचा कर्ता भगवान विश्वकर्मा याने हे शास्त्र आपल्या हवाली करून आपल्या जगण्याचा मार्ग सोपा केला आहे. 
 
आधुनिक फ्लॅटसंस्कृती आता सगळीकडेच पसरली आहे. कप्पेबंद अशा या व्यवस्थेत वास्तू आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार वा आपल्याला अनुकूल अशी असतेच असे नाही. अनेकदा त्यात वास्तुदोष असल्याचे समजल्यानंतर तिला अनुकूल बनविणे शक्य नसते. पैशांचा अभाव वा वास्तूची रचना ही त्याची कारणे असतात. पण अशावेळी निराश होण्याचे कारण नाही. 

घरातील सामान, वस्तूंच्या जागा बदलून आपण वास्तुदोष काही मर्यादेपर्यंत नक्कीच कमी करू शकते. उदाहरणच घेऊ. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला स्वयंपाकघर हवे. तसे नसल्यास अग्नी आपल्याला अनुकूल रहात नाही.या परिस्थितीत घरातील फ्रीज, टीव्ही या इलेक्ट्रॉनिक वस्तू या दिशेला ठेवून आपण ती दिशा अनुकूल करून घेऊ शकतो. घराच्या पूर्व व उत्तर दिशेला काहीही ठेवायला नको. त्या रिकाम्या राहायला हव्यात. पण ते शक्य नसल्यास पूर्व वा उत्तर दिशेला ठेवलेल्या वस्तूच्या दीडपट वजनाच्या वस्तू नैरृत्य कोपर्‍यात ठेवल्या पाहिजेत. कारण नैरृत्य कोपरा जड आणि ईशान्य कोपरा हलका असला पाहिजे. 
 
घरातील घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले पाहिजे. असे केल्यास चांगला काळ आपल्या जीवनात येतो. त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागत नाही. ईशान्य कोपर्‍याला कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे. त्यासाठी तेथे पाणी भरलेला माठ ठेवायला हवा. त्याचा सकारात्मक परिणाम होतो. घरातील महत्त्वाच्या कागदपत्रांना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवले पाहिजे. असे न केल्यास त्याच्याशी संबंधित काहीतरी अघटित घडते. अशाच प्रकारे बेडरूम, पूजेची खोली, तिजोरी, बाथरुम, ड्रॉईंग रूम, किचन, मुख्य दार, खिडकी यात बदल करून वास्तुदोष दूर करता येतो.
सर्व पहा

नवीन

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments