महिलांना लहान मुलांसाठी लंच पॅक करणे आव्हानास्पद असते कारण रोज काय द्यावे परत मुलांनी संपूर्ण खाल्ले पाहिजे ही चिंता लहान मुलांच्या आईला सतत असते. तसेच लंच मध्ये दिलेला पदार्थ पौष्टिक असल्यास मुलांना योग्य ते पोषण मिळते. तसाच आपण पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या ओट्सचा एक पदार्थ पाहणार आहोत. जो मुलांना लंच मध्ये देता येईल. तर चला जाणून घ्या रेसिपी.
दोन कप वाफलेले ओट्स
दोन मोठे चमचे तेल
एक चमचा जिरे
दोन हिरवी मिरची कापलेल्या
एक बारीक कापलेला कांदा
एक बारीक कापलेला टमाटा
चवीनुसार मीठ
एक चमचा तिखट
अर्धा चमचा हळद
दोन चमचे कापलेली कोथिंबीर
कृती-
एका पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यामध्ये जिरे घालावे. त्यानंतर हिरवी मिरची, कांदा घालून परतवून घ्यावे.
आता त्यामध्ये टोमॅटो, मीठ घालून दोन मिनिट शिजवावे.
यानंतर हळद, तिखट घालावे.
मग यामध्ये ओट्स, चार कप पाणी घालून कोथिंबीर घालावी व परत पाच मिनिट शिजवावे. तसेच परत वरून हिरवी कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपला ओट्स पासून बनलेला नवीन पदार्थ जो तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात. व मुले देखील आवडीने खातील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.