साहित्य : 200 ग्राम मैदा, 1 चमचा बारीक साखर, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा दूध, 2 चमचे तेल, दीड चमचा इनो.
कृती : सर्वप्रथम मैदा चाळून घ्यावा. ह्यामध्ये बारीक साखर, मीठ, इनो आणि दही घालून मिसळून घ्यावे. आता या मिश्रणात लागत लागत पाणी घालून 10-15 मिनिटे मळून घ्यावे. आता या मळलेल्या गोळ्यामध्ये 2 चमचे तेल टाकून कमीत कमी 10 मिनिटे अजून मळावे.
आता कुकर मध्यम आचेवर 10 मिनिटे तापविण्यासाठी ठेवावे. कुकर मध्ये जाळी किंवा स्टॅन्ड ठेवावे. आता एका पात्रात किंवा पसरट डब्याला तेलाचा हात लावावा. आता या मैद्याच्या गोळ्यांचे मध्यम आकाराचे गोळे बनवून डब्यामध्ये ठेवावे. या गोळ्यांना दुधाचा हात लावावा.
आता या डब्याला 25 ते 30 मिनिटे कुकरमध्ये ठेवावे. कुकरला झाकणाने बंद करू नये फक्त झाकण हळुवार ठेवावे. 25 ते 30 मिनिटे झाल्यावर डबा कुकर मधून काढून घ्यावा. आता या तयार पावांवर तेल किंवा लोणी लावावे. जेणे करून पाव कडक होत नाही. आता या पावांना भाजी बरोबर किंवा चहा बरोबर सर्व्ह करावे.