Festival Posters

गाजर कोफ्ता करी

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (13:09 IST)
साहित्य : अर्धा किलो गाजर, चार टोमॅटो, एक कांदा, थोडं आलं, सहा ते सात हिरव्या मिरच्या, एक चमचा लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, तूप आणि मीठ.

कृतीः गाजर किसून घ्या. कांदा आणि टोमॅटो चिरून बारीक तुकडे करा. एका कढईत थोडं पाणी घालून गाजर शिजवून घ्या. पाणी आटल्यावर गॅस बंद करा. गाजरात तिखट, मीठ, धनेपूड घालून कोफ्ते तयार करा. आता कढईत थोडं तेल घालून कोफ्ते तळून घ्या. त्यानंतर तेल थोडं कमी करा. उर्वरित तेलात जीरं घाला. मग कांदा परतून घ्या. मग हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आलं घालून परता. शेवटी टोमॅटो घालून शिजवून घ्या. थोडं तिखट, मीठ घाला.

पाणी घालून थोडं उकळून घ्या. शेवटी कोफ्ते घालून दोन मिनिटांनी गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घाला. पोळी किंवा पराठ्यासोबत खा.

मधुरा  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

तुम्ही ५ इंच उंच दिसाल! फक्त योग्य पादत्राणे निवडा

सायलेंट हार्ट अटॅक'ची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

खांदेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

प्रेरणादायी कथा : व्यक्तीचे त्याच्या कृतींवरून मूल्यांकन करणे

झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी; टिफिनसाठी उत्तम

पुढील लेख
Show comments