Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोळीपासून घरीच बनवा बाजारासारखे स्वादिष्ट चाऊमीन

Webdunia
सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (12:19 IST)
जवळजवळ अनेक लोकांना चाऊमीन खूप आवडतात. पण मैद्यापासून तयार केलेले चाऊमीन आरोग्यासाठी नुकसानदायक असतात. याकरिता आपण घरीच गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या पोळीपासून अगदी बाजारात भेटतात तसेच चाऊमीन बनवणार आहोत. तर चला जाणून घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
उरलेली पोळी-एक 
तेल - दोन चमचे 
कापलेला लसूण- तीन ते चार 
हिरवी मिरची- तीन 
कांदा- दोन 
गाजर- एक 
शिमला मिरची- एक 
पत्ता कोबी- अर्धा कप 
चवीनुसार मीठ
केचप- एक चमचा 
लाल मिरची सॉस- एक चमचा 
लिंबाचा रस- अर्धा चमचा 
कोथिंबीर चिरलेली- दोन चमचे   
 
कृती- 
सर्वात आधी उरलेल्या पोळ्या दोन जोड्यांमध्ये गुंडाळा आणि एक रोल तयार करावा. आता चाकू, पिझ्झा कटर किंवा कात्रीच्या मदतीने पातळ पट्ट्यामध्ये कापून घ्याव्या. यानंतर कापलेला भाग दुसऱ्या भांड्यात काढून त्यात तेल घालून हलक्या हाताने मिक्स करावे. तसेच आता एका पॅनमध्ये तेल गरम करून मध्ये लसूण घालून परतवून घ्यावा. यानंतर हिरवी मिरची आणि कांदे घालून 2-3 मिनिटे परतून घ्यावे. नंतर कोबी आणि गाजर घालून 3-4 मिनिटे शिजवून घ्यावे. तसेच शिमला मिरची, मीठ, केचप आणि लाल मिरचीचा सॉस घालून मिक्स करावे व शिजू द्यावे. आता त्यात तयार रोटी नूडल्स टाकावे. व 5 मिनिटे चांगले मिक्स करावे. यानंतर लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. तर चला तयार आहे आपले पोळीचे चाऊमीन. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आपल्या जोडीदाराला कसे प्रभावित करावे जेणेकरून नातेसंबंध मजबूत राहतील, जाणून घ्या

विमानात शौचालयातील मलमूत्र कुठे जातं? तुम्हाला माहीत आहे का?

Winter Fruits हिवाळ्यात ही फळे शरीराला हायड्रेट ठेवू शकतात

चिकन कटलेट रेसिपी

पुढील लेख
Show comments