डिनर मध्ये रोज एकसारखे तेच ते जेवण जेऊन प्रत्येकालाच कंटाळा येतो. चला तर मग आज काही नवीन ट्राय करू या. पराठा हा असा एक पदार्थ आहे जो सर्वांना आवडतो. गरम गरम पराठे सर्वचजण आवडीने खातात. तर चला आज आपण बनवूया दही पनीर पराठा, जो चविष्ट तर आहेच पण त्यासोबत हेल्दी देखील आहे. तर चला लिहून घ्या रेसिपी
साहित्य
100 ग्राम पनीर
1 कप दही
1 कप तिखट
1 कप हिरवी कोथिंबीर
गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ
2 चमचे तेल
ओवा
जिरे पूड
बारीक चिरलेली पत्ता कोबी
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली सिमला मिर्ची
कृती
सर्वात आधी एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्या. व त्यामध्ये मीठ, ओवा, तेल टाकून छान मऊ मळून घ्या. व त्यावर झाकण ठेऊन द्यावे. एका बाऊलमध्ये पाणी नसलेले दही घ्यावे. त्यामध्ये पनीर घालावे. सोबत पत्ता कोबी व सिमला मिर्ची आणि कांदा घालावा.
तसेच या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. व तिखट, जिरे पूड, मीठ घालावे. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता हे मिश्रण लाटलेल्या पोळीवर पसरवून पोळीच्या काठांना पाणी लावून तिची घडी घालावी. व परत लाटावी. यानंतर हा पराठा तव्यावर टाकून शेकून घ्यावा. तर चला तयार आहे दही पनीर पराठा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.